Homeगडचिरोलीवीजेच्या कडकाडाटासह मुसळधार पावसाची शक्यता

वीजेच्या कडकाडाटासह मुसळधार पावसाची शक्यता

 

प्रशासनाकडून सावधानतेचा इशारा

गडचिरोली प्रतिनिधी/सतीश कुसराम

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या ईशाऱ्यानुसार जिल्ह्यात दिनांक 13.10.2020 ते 17.10.2020 या कालावधीत वीजेच्या कडकाडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे. जिल्हयातील सर्व नागरिकांना तसेच नद्याकिनारी पुरप्रवण भागातील गावांना सुचित करण्यात आले आहे. वरील कालावधीत जिल्हयात सर्वत्र होणाऱ्या वीजेच्या कडकडाटासह मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यतेचा इशारानुसार सुचना निर्गमीत करण्यात आल्या आहेत. संभाव्य धोके लक्षात घेता जिवीत हानी व वित्त हानी टाळण्याच्या दृष्टीने संबंधित यंत्रणाकडून आवश्यक उपाययोजना व विभागाकडील शोध व बचाव पथक, बचाव साहित्य इत्यादी सुविधा कार्यान्वित आल्या आहेत. नगर परिषद/नगर पंचायत/ग्रामपंचायत विभागातील अधिकारी/ कर्मचारी यांना वादळामुळे झाडे पडून रस्ते वाहतूक विस्कळीत वा बंद होणार नाही यांची दक्षता घेण्या बाबत सुचना देण्यात आल्या आहेत. जिल्हास्तरीय विभागप्रमुखांना अधिनस्त अधिकारी/कर्मचारी मुख्यालयी हजर राहून संवेदनशील ठिकाणावर लक्ष ठेऊन योग्य ती दक्षता घेणेबाबत सुचित करण्यात आले आहे. अति मुसळधार पावसामुळे मोडकळीस आलेल्या इमारती, पुल व नाला इत्यादी ठिकाणी विशेष काळजी घेवून वाहतूक सुरक्षित ठिकाणी वळविण्यात यावी किंवा तात्पुरती थांबविण्यात यावी. नदी-नाला, धबधबा इत्यादी ठिकाणी कोणतीही व्यक्ती /वाहन प्रवेश करणार नाही यांची दक्षता घ्यावी. पाऊस पडत असतांना विजा कडकडाट असताना झाडाखाली उभे राहून नये, मोबाईल बंद करुन ठेवणे, इलेक्ट्रिक वस्तूपासून दूर राहणे, शक्यतो घराबाहेर पडू नये. अशा परिस्थितीत पक्के घर किंवा इमारतीत आसरा घ्यावा. दामिनी हे वीज माहिती देणारे अँप आपल्या क्षेत्रात पडणाऱ्या आगाऊ वीजपडीची माहिती तसेच वीजपडीपासून संरक्षण करावयाच्या उपाययोजनेची माहिती देते. करिता सदरचे अँप प्ले स्टोअर वरुन सर्व नागरिकांनी डाऊनलोड करण्याबाबत जनजागृती करण्यात यावी. कुठल्याही अफवावर विश्वास ठेवू नका व अफवा पसरवू नका. कुठल्याही अशा मिळालेल्या बातमीची खात्री अधिकृत सुत्राकडून करुन घ्यावी. मुसळधार पावसामुळे उद्भवलेल्या कुठल्याही प्रकारच्या आपत्तकालीन स्थितीमध्ये मदतीकरिता 07132-222031 या आपत्ती व्यवस्थापन क्रमांकावर संपर्क साधावा, असे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी कृष्णा रेड्डी यांनी कळविले आहे.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!