Homeचंद्रपूरअल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे करणारा पोलीसांचा ताब्यात ;बल्लारपूर येथिल घटना

अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे करणारा पोलीसांचा ताब्यात ;बल्लारपूर येथिल घटना

चंद्रपूर प्रतिनिधी/ कैलास दुर्योधन

अल्पवयीन मुलीशी अश्लिल चाळे करणाऱ्या तरूणाला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.ही घटना चंद्रपूर जिल्ह्यातील बल्हारपूर येथे घडली.

प्राप्त माहीतीनूसार बल्लारपूर शहरातील लोकमान्य टिळक वॉर्ड परिसरात असलेल्या चवथ्या वर्गात शिकणार्या अल्पवयीन मुलीला घराशेजारी राहणारा राकेश चूनका निषाद ( वय – 25 ) याने पिढीत मुलीला मांजर शोधण्याचा बहाण्याने बोलावले. आणि अश्लिल चाळे सूरू केले. मुलगी रडत रडत घरी आली. तिने आईला घडलेला प्रकार सांगितला.पिढीत मुलीच्या आईने पोलीस स्टेशन गाठले.घडलेल्या प्रकाराची तक्रार दिली.तक्रारी वरून आरोपी विरुद्ध भारतीय दंड संहिता 1860 च्या कलम 354 A व B, 506, बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012 च्या कलम 8 व 12 पोस्को नुसार तसेच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989 च्या कलम 3(1)(W)(I),3(2)(2)(Va) नुसार बल्लारपूर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास मा.स्वप्नील जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी राजुरा, मा. शिवलाल भगत पोलीस निरीक्षक बल्लारपूर यांच्या मार्गदर्शनाखाली मपोउपनि रेखा ब काळे पोक्सो तपास पथक राजुरा, मा.विनीत घागे, पोलीस उपनिरीक्षक बल्लारपूर करीत आहेत.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!