पोंभुर्ण्यात बैलबंडी मोर्चा ;काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांचे नेतृत्व

0
170

 

पोंभुर्णा

केंद्रातील भाजप सरकारचा शेतकरी ,शेतमजूर आणि कामगार विरोधक विधेयकाचे पोंभुर्ण्याथा बैलबंडी मोर्चा काढीत विरोध करण्यात आला.मोर्च्याचे नेतृत्व काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांनी केले. हे तिन्ही कायदे शेतकरी ,शेतमजूर,कामगारांसाठी मारक ठरणारे आहेत.केंद्रातील भाजप सरकार शेतकरी विरोधक असल्याचा आरोप देवतळे यांनी केला आहे.मोर्च्यात मोठ्या संख्येनी जनतेनी सहभाग नोंदविला होता.

केंद्रातील भाजप सरकारने शेतकरी ,शेतमजूर आणि कामगार विधेयक आणले.हे तिन्ही कायदे तिनही घटकांसाठी मारक ठरणारे आहेत.या कायद्यांमुळे बाजार समित्या नष्ट होणार आहे.शेतमालाला हमीभाव,बाजारभाव मिळणार नाही.मुठभर व्यापारांचे हीत डोळ्यासमोर ठेऊन हे कायले आणल्या गेले आहेत. या कायद्यांचा विरोध करण्यासाठी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांच्या नेतृत्वाखाली पोंभुर्ण्यात भव्य बैलबंडी मोर्चा काढण्यात आला.यावेळी प्रदेश प्रतिनिधी घनश्याम मुलचंदानी,तालुकाध्यक्ष कवडूजी कुंदावार,जिल्हा महासचिव प्रमोद बोरीकर,गटनेते आशिष कुरेशी,जयपाल गेडाम उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here