चामोर्शी तालुक्यातील घोट या गावात आज पासून जनता कर्फ्यु

696

 

व्यापारी असोसिएशनच्या बैठकीत घेण्यात आला निर्णय

गडचिरोली जिल्हा संपादक / प्रशांत शाहा

तालुका मुख्यल्यापासून अवघ्या १८ किमी अंतरावर असलेल्या घोट या गावात काही कोरोना रुग्ण आढळल्याने घोट येथील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आज रविवार ११ ऑक्टोबर ते रविवार १८ ऑक्टोबर प्रयन्त जनता कर्फ्यु लागू करण्याचा निर्णय घोट येथील व्यापारी असोसिएशनने घेतला आहे.
काल सायंकाळी घोट येथील साई मंदिरात व्यापारी असोसिएशनचे पार पडलेल्या बैठकीत घेण्यात आला निर्णय
या बैठकीत औषधी दुकाने व कृषी केंद्र वगळता इतर सर्व बाजार पेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला
सर्व नागरिकांनी या जनता कर्फ्युला सहकार्य करावे
असे आव्हान व्यापारी असोसिएशन व लोकप्रतिनिधी यांनी केली आहे.