धाबा ग्रामपंचायतेच्या संगणक चालकाची नियुक्ती रद्द ; निष्काळजीपणा भोवला

0
524

 

चंद्रपूर / कैलास दूर्योधन

धाबा ग्रामपंचायतेत कार्यरत संगणक चालकावर निष्काळजीपणा,कामात दिरंगाई व लाभार्थ्याकडून नियमबाहृयरीत्या पैश्याची मागणी केल्याचा ठपका ठेवित नियुक्ती रद्द करण्यात आली आहे.ही कार्यवाही उपमुख्य कार्यकारी अधिकारी ( पंचायत ) चंद्रपूर यांनी केली आहे.धाबा ग्रामपंचायतेचा संगणक चालक शालिनी तिमाडे यांच्या विरूद्ध पंचायत समिती गोंडपिपरीला तक्रार करण्यात आली होती.

गोंडपिपरी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या धाबा ग्रामपंचायतेत शालिनी तिमाडे संघणक चालक पदावर कार्यरत होत्या.तिमाडे या लाभार्थ्याकडून नियमबाहृयरीत्या पैश्याची मागणी करतात,कामात दिरंगाई करतात असा आरोप करित काहीनी तिमाडे यांना संघणक चालक पदावरून खाली करण्याची मागणी करणारे निवेदन पंचायत समिती गोंडपिपरी येथे दिले होते.
निवेदनात केलेले आरोप चौकशीअंती खरे आढळून आल्याने संघणक चालक पदावरून शालिनी तिमाडे यांना काढण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here