कृषी विषयक कायद्यांना राज्‍य सरकारने दिलेली स्‍थगिती त्‍वरीत दूर करा ;माजी आमदार संजय धोटे

0
145

महाविकास आघाडी विरोधात गोंडपिपरी भाजपचे निषेध आंदोलन

Advertisements

गोंडपिपरी / सुरज माडुरवार

Advertisements

नवीन कृषी कायद्यामुळे देशातील शेतकरी बंधमुक्‍त आणि दलालांच्‍या जोखडातून मुक्‍त होणार असून आपल्‍या कष्‍टाने पिकविलेल्‍या शेतमालाची विक्री व बाजारपेठेत त्‍यांना स्‍वातंत्र्य मिळणार आहे. पंतप्रधान मोदीजींनी एमएसपी कुठल्‍याही परिस्‍थीतीत बंद होणार नसल्‍याचे स्‍पष्‍ट केले आहे. या कृषी सुधारणा विधेयकामुळे शेतक-यांना ख-या अर्थाने स्‍वातंत्र्य मिळणार आहे, मात्र शेतक-यांबाबत महाविकास आघाडी सरकारने पुतना मावशीचे प्रेम दाखवत या कृषी विषयक कायद्याला स्‍थगिती दिली आहे. ही स्‍थगिती त्‍वरीत उठवावी व राज्‍यात केंद्राच्‍या या कायद्याची अंमलबजावणी करावी यासाठी हे निषेध आंदोलन आम्‍ही करीत असल्‍याचे प्रतिपादन नाजी आमदार संजय धोटे यांनी केले.

तहसील कार्यालया भाजपा गोंडपिपरी शाखेतर्फे महाविकास आघाडी सरकारच्‍या विरोधात निषेध आंदोलन करण्‍यात आले. या आंदोलनात माजी आमदार संजय धोटे यांच्‍यासह जि. सदस्य वैष्णवी बोडलावार,सभापती सुनीता येग्गेवार,जी.प सदस्य स्वाती वडपल्लीवर,अमर बोडलावार,सरपंच धाबा रोशनी अनमूलवार,भाजप तालुका अध्यक्ष बबन निकोडे,संजय झाडे,निलेश पुलगमकर,नगरसेवक राकेश पुन,माजी उपनगराध्यक्ष चेतन गौर,गणेश डहाळे,गणपती चौधरी,सुनील फुकट,निलेश संगमवार,सुहास माडुरवार,माजी सभापती दीपक सातपुते,पं. स सदस्य वासमवार,साईनाथ मास्टे,गणेश मेरुगवार ,नाना येल्लेवार उपस्थित होते.महाविकास आघाडी सरकारचा निषेध करीत मागण्यांचे निवेदन तहसीलदार मेश्राम यांच्या तर्फे मुख्यमंत्र्यांना पाठवले.यावेळी भाजपचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

Advertisements

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here