ग्रंथालयाचा इमारतीत नगरपंचायतेचा कारभार ;ग्रंथ अळगडीत;वाचन संस्कृतिला ब्रेक

402

 

गोंडपिपरी / शेखर बोनगिरवार

तालुक्यातील ग्रंथप्रेमींसाठी गोंडपिपरी शहरात प्रशस्त ग्रंथालयाची इमारत उभी झाली.या इमारतीतून ग्रंथवसा चालणे अपेक्षित होते.मात्र जिथे वाचन संस्कृती जोपासायला हवी होती तिथून आज नगरपंचायतेचा कारभार सूरू आहे. या ग्रंथालयातील ग्रंथ अडगळीत पडले असून वाचन संस्कृतीला ब्रेक लागला आहे.

गोंडपिपरी शहरात महात्मा गांधी वाचनालय होते,आजही आहे. या वाचनालयात शेकडो जूनी,नवी पुस्तके होती.वाचनालयात काही वार्षिक सभासद तर अनेक आजिवन सभासद होते. तालुक्यातील तरूणांना,विध्यार्थांना या वाचनालयाचा मोठा आधार होता.वाचनालयात येणाऱ्या वाचकांची संख्या मोठी त्यामानाने वाचनालयाची जागा अपुरी पडत होती.इमारतही जिर्ण झाली होती. त्यामुळे वाचनालयासाठी प्रशस्त इमारत देण्याची मागणी पुढे आली. आमदार सूधिर मुनगंटीवार मंत्रीपदावर असतांना माजी आमदार संजय धोटे यांनी नव्या इमारतीची मागणी केली. इमारत बांधकामासाठी 25 लाखांचा आसपास निधी मंजूर करण्यात आला.इमारतीचे बांधकाम पुर्ण झाले. यामुळे वाचकात आंनद पसरला होता.दरम्यानचा काळात नगरपंचायतीची इमारत बांधकामही मंजूर झाले.नगरपंचायतेची जूनी इमारत पाडून त्या ठिकाणी नविन इमारतीचे बांधकाम होणार आहे. त्यामुळे नगरपंचायतेने वाचनालयाचा इमारतीतून कारभार सूरू केला. वाचनालयासाठी खाजगी खोली भाड्यानेषघेतली.त्या खोलीलाही आता कुलूप लागले आहे.वाचनालयाची ग्रंथसंपदा अडगळीत पडली. या प्रकाराने वाचनप्रेमी मात्र संतापले आहे.त्यात विध्यार्थांनाही पुस्तके वाचायला मिळत नसल्याने त्यांचेही नुकसान होत आहे. दरम्यान विध्यार्थ्यांसाठी महात्मा गांधी वाचनालय उपलब्ध करून द्यावे ही मागणी भारतीय यूवा मोर्चा विध्यार्थी आघाडीने मुख्याधिकार्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.