Advertisements
Home राज्य चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील रस्त्यांच्या कामाकडे विजय वडेट्टीवार यांनी प्रशासनाचे वेधले लक्ष

चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील रस्त्यांच्या कामाकडे विजय वडेट्टीवार यांनी प्रशासनाचे वेधले लक्ष

रस्त्याची कामे उत्तम दर्जाची व्हावी / ना.विजय वडेट्टीवार

Advertisements

चौकशी करून कामे दिलेल्या अवधीत पूर्ण करा… अशोकराव चव्हाण बांधकाम मंत्री

मुंबई

चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात हायब्रीट अँन्यूटी अंतर्गत १६०० कोटीची कामे विविध कंत्राटदाराकडून सुरू आहेत. सर्व कामे कंत्राटदाराने घेताना शासन बांधकाम विभाग नियमानुसार ६० टक्के आणि कंत्राटदार ४० टक्के असा नियम वापरून संबंधित कंत्राटदार यांना परवानगी देण्यात आलेली होती.तरी,चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यामध्ये अद्यापपर्यंत एकाही कंत्राटदाराने ४० % निधीची उभारणी बँकेकडून कर्ज दाखवून केलेली नसून कंत्राटदाराने देखील स्वताकडून निधीची उभारणी करून कामे पूर्ण केलेली नाहीत.तरी चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील अपूर्ण रस्त्यांच्या कामासंबंधितची बाब आपत्ती व मदत पुनर्वसन मंत्री श्री.वडेट्टीवार यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या निदर्शनास आणून ही कामे तातडीने पूर्ण करण्यासंबंधीतचे निर्देश दिले.

चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात हॅब्रिट ॲम्युनिटी अंतर्गत रस्त्यांच्या कामासंदर्भात आढावा बैठक आज मंत्रालयात संपन्न झाली त्यावेळी श्री. वडेट्टीवार बोलत होते. यावेळी सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सैनिक, मुख्य अभियंता श्री. दशपुते, चंद्रपूरचे अधीक्षक अभियंता साखरवडे, गडचिरोलीचे अधीक्षक अभियंता गायकवाड यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील रस्त्यांची कामे संथगतीने सुरु असून रस्त्यांची दुरवस्था आहे.कंत्राटदार ४०% निधीचा खर्च करत नसून ही कामे शासनाच्या ६० % निधीतूनच होत असल्याने कामे निकृष्ट दर्जाची होत आहेत.यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत.तरी, या रस्त्यांची कामे उत्तम दर्जाने फिलेल्या कालावधीत तातडीने पूर्ण व्हावे असे निर्देश ना. विजय वडेट्टीवार यांनी या बैठकी दरम्यान दिले. या बाबत पुढील कारवाईसाठी संबंधित विभागाच्या अधिकार्याना सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी निर्देश दिले असून तातडीने कामे पूर्ण होतील असे आश्वासन त्यांनी दिले आहे.

India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
मुन्ना तावाडे | मुख्य संपादक, 9096780556
RELATED ARTICLES

ई- मॅरोथॉन मध्ये सहभागी व्हा….

सुशीलाबाई रामचंद्रराव मामीडवार कॉलेज ऑफ सोशल वर्क, पडोली आणि सी.वाय.डी.ए. संस्था पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने १९ नोव्हेंबर “जागातीक शौचालय दिवस २०२०” च्या निमित्ताने ई-...

हाथरस प्रकरणातील नराधमांना फाशी द्या ;भिम कायद्या संघटनेची मागणी

मुंबई / दिगांबर साळवे ( विशेष प्रतिनिधी ) उत्तर प्रदेशातील हाथरस प्रकरणातील दोषीना फासावर लटकविण्याची मागणी भिम कायदा या सामाजिक संघटनेने केली आहे. याबाबतचे निवेदन...

केंद्र शासनाने पारित केले शेतकरी व सामान्य जनते विरोधी बिल

काँग्रेस महाराष्ट्र राज्य महासचिव किशोर गजभिये सर यांची खंत लोकसभा व राज्यसभेत ही दोन बिल करण्यात आले पारीत, अत्यावश्यक वस्तू कायदा 1955 यातही करण्यात आली...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

भारतीय जनता पार्टी गडचिरोली तर्फे भव्य तिरंगा रथयात्रा…घराघरावर तिरंगा लावुन स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करूया-खा.अशोकजी नेते

नितेश खडसे (जिल्हा संपादक, गडचिरोली) गडचिरोली: स्वातंत्र्याच्या 75 व्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त भव्य बाईक रॅलीचे कारगिल चौक गडचिरोली येथे आयोजन करण्यात आले.हि बाईक रॅली या...

चंद्रपूर महानगर पालिकेच्या कार्य प्रणालीवर प्रश्नचिन्ह? चंद्रपुर शहरातील घनकचरा रस्त्यावर…

श्याम म्हशाखेत्री जिल्हा संपादक, चंद्रपुर चंद्रपुर: चंद्रपुर महानगरपालिका तर्फे घनकचरा व्यवस्थापन चुकीच्या पद्धतीने केल्या जात असल्याने सर्वसामान्य लोकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. चंद्रपुर शहरातील...

शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष, माजी आमदार विनायक मेटे यांचे अपघातात निधन…अनेक दशकापासून राजकारणात सक्रिय सहभाग…

नागपूर : चक्रधर मेश्राम दिनांक:-14/08/2022 Vinayak Mete terrible accident शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष आणि माजी आमदार विनायक मेटे यांचं कार अपघातात निधन झालं आहे. मुंबई-पुणे...

राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, काँग्रेस नेते तथा आमदार विजय वडेट्टीवार यांचा दौरा…

*राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, काँग्रेस नेते तथा आमदार* *श्री. विजय वडेट्टीवार यांचा* *दि.१४ , व १५ ऑगस्ट २०२२ रोजीचा दौरा कार्यक्रम....* *रविवार दि. १४ ऑगस्ट २०२२* *सकाळी ८...

Recent Comments

Advertisements
Advertisements
Don`t copy text!