आठ फूट अजगराला जिवनदान

0
217

आष्टी प्रतिनिधी/चेतन कारेकर आष्टी

Advertisements

आष्टी शहरात विविध साप आढलने तसे नवे नाही.मात्र आत्ताच विश्राम गृहाची साफ सफाई व दुरुस्ती करा अशी मागणी केलेल्या आष्टी येथील विश्राम गृहातील जागेवरच तिथे वावर असलेल्या लोकांना साप दिसला, लोकांनी तत्काळ वनविभागाशी संपर्क साधून माहिती दिली, माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी, सर्पमित्रांसोंबत पोहचून घटनास्थळ गाठून शिताफीने ८ फूट लांबीच्या भल्या मोठ्या अजगराला पकडले.
त्यानंतर त्याला इल्लुर बिटातील सितापुर कंपार्टमेंट नं. २२३ येथे सुखरूप सोडून अजगराला जीवनदान दिले.
यावेळी वनरक्षक एन. डी. सोनवणे, प्रभारी वनपरिक्षेत्र अधिकारी एस. जी. मेश्राम, क्षेत्र सहाय्यक एस.जी. गोवरधन, वनरक्षक ए. एम. कुमेटी, विश्वनाथ मंथवर, सोबत सर्पमित्र सूरज सोयाम,राहुल तांगडे, परेश मोहूर्ले, प्रदीप नागुल वार आदि उपस्थित होते.

Advertisements
Advertisements

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here