गडचिरोली जिल्हयात पून्हा आज 99 कोरोनामुक्त तर नवीन 111 बाधित

405

गडचिरोली प्रतिनिधी/सतिश कुसराम

जिल्हयात मागील चोवीस तासात सक्रिय रूग्णांपैकी 99 जण कोरोनामुक्त झाले तर 111 जणांची नव्याने कोरोना बाधित म्हणून नोंद झाली. यामुळे जिल्हयातील कोरोना बाधितांचा सक्रिय आकडा 844 झाला. आत्तापर्यंत एकुण बाधित 3197 कोरोना बाधितांपैकी 2332 रूग्णांनी कोरोनावर मात केली तर 21 जणांचा मृत्यू झाला आहे.

आज 99 कोरोनामुक्त रूग्णांमध्ये गडचिरोली तालुक्यातील 40, वडसा 15, आरमोरी 4, एटापल्ली 3, अहेरी 5, चामोर्शी 6, धानोरा 2, कोरची 6, भामरागड 5, मुलचेरा 1, सिरोंचा 6 व कुरखेडा येथील 6 जणांचा समावेश आहे.

नवीन 111 कोरोना बाधितांमध्ये गडचिरोली 35, अहेरी 26, आरमोरी 10, भामरागड 1, चामोर्शी 2, धानोरा 4, एटापल्ली 15, कोरची 7, कुरखेडा 2, सिरोंचा 3 व वडसा येथील 6 जणांचा समावेश आहे.

नवीन बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील 35 जण आढळून आले. यात रामनगर 1, इतर जिल्हयातील 1, कॅम्प एरिया 1, आयटीआय चौकाजवळ 1, गोकुळ नगर 3, डॉ.मलीक दवाखान्याजवळ 1, झासी रानीनगर 1, लांझेडा 1, आरोग्य वसाहत 1, नवेगाव परिसर 7, पोर्ला, पीडब्यू कॉलनी 1, रामनगर 3, रामपुरी 1, रेड्डी गोडावून 1, साईनगर 5, सर्वोदया वार्ड 1, स्नेहानगर 1, वनश्री कॉलनी 1 व येवली येथील 1 जणाचा समावेश आहे. अहेरी येथील 26 मध्ये शहर 14, बोरी 2 व मरपल्ली येथील 10 जणांचा समावेश आहे. आरमोरी 10 मध्ये सर्व स्थानिक आहेत. भामरागड एक जण स्थानिक आहे. चामोर्शी येथील 2 आष्टी येथील आहेत. धानोरा येथील 4 जण शहरातील आहेत. एटापल्ली मधील 15 मध्ये 12 सीआरपीएफ व 3 हेडरी येथील एसआरपीएफ आहेत. कोरची 7 मध्ये स्थानिक 4, बेडगाव, बिरीहाटोला व टेकाबेडल कोरची येथील प्रत्येकी एक एक आहेत. कुरखेडा 2 मध्ये आंतरगाव 1 व स्थानिक 1 जणाचा समावेश आहे. सिरोंचा 3 सर्व शहरातील आहेत. वडसा येथील 6 मध्ये शंकरपूर 1, सीआरपीएफ 2, होमगार्ड 1, कस्तुरबा वार्ड 1 व विसोरा येथील 1 जणाचा समावेश आहे.

*जिल्हयातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 72.94 टक्के आहे तर सद्या सक्रिय रूग्ण 26.40 टक्के आहेत. तर मृत्यू दर हा 0.66 टक्के आहे.*