गडचिरोली प्रतिनिधी / सतिश कुसराम
▪️ जिल्हयात 7.18 लक्ष नागरिकांची तपासणी पुर्ण.
▪️2610 संभावित रूग्णांना शोधण्यात पथकाला आले यश.
▪️ पैकी 2322 कोरोना चाचण्यात 211 जण बाधित आढळले.
▪️उर्वरीत नागरिकांची तपासणी 10 ऑक्टोबर पर्यंत पुर्ण होणार.
गडचिरोली
माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम राज्यासह जिल्हयात लोकसहभागातून राबविली जात आहे. गडचिरोली जिल्हयात कालपर्यंत एकुण लोकसंख्येपैकी 63 टक्के म्हणजेच 7,18,994 नागरिकांची तपासणी पुर्ण झाली. यात सारी, आयएलआय व ऑक्सीजन कमी असणारे संभावित 2610 जण आढळून आले. त्यातील 2322 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यातील 211 जण कोरोना बाधित असल्याचे आढळून आले. यामुळे या बाधितांना वेळेत उपचार व आरोग्य सेवा मिळणार आहे. यातून जिल्हयात कोरोना वाढीला व कोरोनामूळे होणा-या मृत्यूस ब्रेक मिळाला आहे असे म्हणता येईल. कोरोना बाधितांना शोधून त्यांना आवश्यक संदर्भ सेवा देणे हे या मोहिमेचे उद्दीष्ट आहे. लोकांमधील चूकीचे गैरसमज दूर होवून जिल्हयात लोकांकडून या मोहिमेला सहकार्य मिळत असल्याचे चित्र आहे.
*आढळून आलेले सर्वात जास्त कोरोना बाधित दुर्गम भागात* : माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेत गरजूंना वेळेत उपचार मिळावे म्हणून ग्रामीण भागात मोहिमेवर जास्त प्रमाणात लक्ष केंद्रित केले आहे. जिल्हयातील धानोरा(53), एटापल्ली(10), कोरची(44) व कुरखेडा(30) या दुर्गम भागात 137 बाधित रूग्ण मिळाले आहेत. तसेच 211 मधील उर्वरीत अहेरी 9, आरमोरी 15, चामोर्शी 7, गडचिरोली 5, मुलचेरा 2, सिरोंचा 7, वडसा 20 व वडसा शहरी भागात 7 जण आढळून आले आहेत.
*तालुकानिहाय तपासणी करण्यात आलेल्या घरांची व कुटुंबातील सदस्यांची माहिती*
अहेरी – 9765 (40189), आरमोरी -19043 (66414), भामरागड -4902 (19204), चामोर्शी – 29894 (102457), धानोरा – 28144 (66036), एटापल्ली – 9358 (44894), गडचिरोली – 9747 (61622), कोरची- 8134 (41541), कुरखेडा -15992 (41541), मुलचेरा – 5701 (25893), सिरोंचा – 10864 (43553) व वडसा – 11342 (55322). तसेच शहरी भागात गोकुळनगर गडचिरोली – 4401 (17280) व वडसा शहरी- 4203 (23421) .
एकुण – 171490 घरांमध्ये 718994 नागरिकांची तपासणी पुर्ण.
*उर्वरीत नागरिकांची तपासणी 10 ऑक्टोबर पर्यंत पुर्ण होणार* : माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेत जिल्हयात 13 दिवसात 63 टक्के सर्वेक्षण पुर्ण झाले आहे. तर उर्वरीत सर्वेक्षण 10 ऑक्टोबर पुर्वी पुर्ण करण्याचे नियोजन आहे. पहिल्या टप्यातील तपासणी नंतर पुन्हा पुढिल सर्वेक्षण 14 ऑक्टोबरला सुरू होणार आहे. ते 24 ऑक्टोबरला संपेल. यातून जिल्हयातील कोरोना संसर्ग साखळी तोडून कोरोनामूळे होणारे मृत्यू रोखण्यास मदत होणार आहे.