दूहेरी संकटाने बळीराजा खचला ; वादळी पावसात शेतपिके जमिनीवर लोळली आता वन्यजीवांचा हैदोस

0
209

भंगाराम तळोधी / राजू झाडे

काही दिवसापुर्वी आलेल्या वादळी पावसात शेतपिके जमिनीवर लोळली होती.हातात येणाऱ्या पिकांचे नुकसान बघून बळीराजा खचला होता. यातून अद्यापही बळीराजा सावरलेला नाही.अश्यात आता वन्यजीवांचा हैदोसाने शेतपिकांचे मोठे नुकसान होत आहे. या दूहेरी संकटाने गोंडपिपरी तालुक्यातील बळीराजा हवालदिल झाला आहे.

गोंडपिपरी तालुक्यातील काही भागाला चार पाच दिवसापुर्वी वादळी पावसाने अक्षरशः झोडपून काढले होते.याचा सर्वाधिक फटका शेतपिकांना बसला होता. तालुक्यातील अळेगाव परिसरातील धान,कपाशी आणि मिरचीचे पिके जमिनीवर लोळली. पिकांचे मोठे नुकसान झाले होते.काही दिवसात हातात येणाऱ्या पिकांची अवस्था बघून बळीराजा खचला.या संकटातून बळीराजा अद्यापही सावरलेला नसतांना दूसरे संकट कोसळले आहे.शेताततील उभ्या पिकात वन्यजीवांचा हैदोस सूरू आहे.या प्रकाराने शेतपिकांचे मोठे नुकसान होत.वन्यजीवांना शेतपिकापासून दूर ठेवण्यासाठी बळीराजा नानाविध उपाययोजना अमलात आणित आहे.मात्र या उपाययोजना कुचकामी ठरत आहे.दूसरेकडे नुकसान झालेल्या पिकांचा तूलनेत वनविभागाकडून मिळणारी नुकसानभरपाईची रक्कम तोकडी आहे.त्यामुळे अनेक शेतकरी नुकसानभरपाईचीचा अर्ज वनविभागाकडे करित नसल्याचे चित्र आहे.शेतपिकावर ओढावलेल्या दूहेरी संकटाने बळीराजा हवालदिल झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here