देसाईगंज वडसा येथे संकल्प सेवा समितीच्या वतीने रक्तदान शिबीर संपन्न

312

आ.कृष्णा गजबे यांच्या शुभहस्ते शिबिराचे उदघाटन

गडचिरोली जिल्हा संपादक प्रशांत शाहा

कोरोनाचा फैलाव सुरुच आहे. त्यातच रक्त साठ्यात मोठी कमी असल्याचे पुढे आले आहे. जिल्ह्यात रक्त साठा मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. जिल्हा ब्लड बँक यांच्याकडे रक्त उपलब्ध नसल्यामुळे मोठी समस्या निर्माण होत होती. त्यामुळे देसाईगंज शहरातील काही नामांकित सामाजिक संघटना समोर पुढे येऊन रक्तदान शिबिरांचे आयोजन दिनांक ०४ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता पासून करण्यात आले होते..
यामध्ये राजस्थानी सेवा मंडळ , मुस्लिम समाज मंडळ , नई दिशा मंडळ , साई सेवा समिती ,फोर्स फौंडेशन ,गजानन महाराज मंदिर समिती,शिवोत्सव समिती समिती , बाल गणेश उत्सव मंडळ,लोकमत सखी मंच,भवानी मंडळ,टायगर ग्रुप ,शिवप्रतिष्ठान समिती व तसेच शहरातील नामांकित संघटनेने या सामाजिक कार्यमध्ये सहभागी झाले होते.
जिल्हात दिवसेंदिवस वाढ होत असलेल्या कोरोनाच्या महामारीमुळे आपण एकजुटीने एकत्र येऊन प्रत्येक तालुक्यात रक्तदान आयोजित केले पाहिजे असे प्रतिपादन आ.कृष्णा गजबे यांनी केले या वेळी मा किसन जी नागदेवे सभापती पाणी पुरवठा व जलनिवारण समिती,मा विशाल मेश्राम उपविभागीय अधिकारी देसाईगंज,शालुताई दंडवते नगराध्यक्ष न प देसाईगंज,मा मोतीलाल कुकरेजा उपाध्यक्ष न प देसाईगंज,बावनकर ताई सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन देसाईगंज,राजुभाऊ जेठाणी तसेच देसाईगंज येथील सेवा समितीचे सर्व पदाधिकारी नागरिक यांच्या उपस्थितीत शिबिराचे उदघाटन संपन्न.