Homeचंद्रपूरगोंडपिंपरीअवैध दारू सह ३,२०,००० चा मुद्देमाल जप्त

अवैध दारू सह ३,२०,००० चा मुद्देमाल जप्त

गोंडपिपरी पोलिसांची धडक कारवाई;आरोपी फरार

धाबा /अरूण बोरकर

मूल मार्ग गोंडपिपरीकडे येत असलेल्या अवैध दारू वर गोंडपिपरी पोलिसांनी काल पहाटे धाड टाकीत अवैध दारू सह ३,२०००० रू. चा मुद्देमाल जप्त केला.
तालुक्यात अनेक छुप्या मार्गाने अवैध दारू चा पुरवठा होतो.तालुक्यापासून तेलंगणा राज्याची सीमा जवळ असल्याने सदर मार्गावरून येणाऱ्या अनेक दारू तस्करी वर पोलिसांनी कारवाही केली आहे.अश्यातच काल मुल मार्गे गोंडपिपरी येथे एका कार मध्ये दारू येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच ठाणेदार संदीप धोबे यांनी आपले सहकारी पो.ह.देवेश कटरे व अन्य सहकाऱ्यांसह वढोली मार्गावर पाळत ठेवली.पहाटे ४.०० वाजताच्या सुमारास समोरून एक संशयास्पद कार क्रमांक mh३१ cp १५३९ येताना दिसली.तिला थांबविण्याचा प्रयत्न करताच कार चालकांनी गाडी रोड खाली उतरवून जवळच असलेले खराळपेठ येथील जंगल गाठले, व गाडी जंगलात सोडून चालक फरार झाला.सदर गाडीची झडती घेतली असता गाडीच्या
डीक्कित ७ खरड्याचे बॉक्स, सुपर स्याँनिक रॉकेट संत्रा देशी दारू असे लेबल असलेल्या प्रत्येकी शंभर नग, व बाकी इतर दारूच्या बाटल्या असे एकूण ७०० नग प्रत्येकी ९० मिली. भरलेल्या दारूच्या बाटल्या अंदाजे किंमत ७०,००० रू. चा माल व होंडा सिटी कार क्रमांक एम एच 31, C P 1539 जुनी वापरातील अंदाजीत किंमत २ लाख ५० हजार रुपये असा एकूण तीन लाख वीस हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मात्र घटनास्थळावरून आरोपी पसार होण्यात यशस्वी झाला. सदर घटनेचा तपास ठाणेदार संदीप धोबे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे. तालुक्यात अवैध दारूच्या होत असलेल्या कारवाही ने दारू तस्करांचे धाबे दणाणले आहेत.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!