गोंडपिपरीतील विनयभंग प्रकरण आणि माध्यमानी अचानक साधलेली चूप्पी

830

 

गोंडपिपरी

गोंडपिपरीच्या शैक्षणिक इतिहासाला काळवंटणारी घटना गोंडपिपरी शहरात घडली. एका मिनिआयटीआयचा संचालकाने अल्पवयीन विध्यार्थीनीचा विनयभंग केला.गोंडपिपरीतील माध्यमांनी हा प्रश्न काही दिवस रेटून धरला. मात्र गोंडपिपरीतील मिनी आयटीआय ज्या संस्थेची सलग्न होती त्या संस्थेची एक बातमी लिहून माध्यमानी चूप्पी साधली. माध्यमानी अचानक साधलेल्या या चूप्पीची भलतीच चर्चा तालुक्यात सूरू आहे.

गोंडपिपरी हा तालुका मागासलेला असला तरी सूसंस्कृत तालुका आहे.सारेच माणसे येथे प्रेमाने राहतात. येथिल शैक्षणिक परंपराही वैभवशाली आहे.गुरू-शिष्याचे अतिशय आपुलकीचे नाते येथे बघायला मिळते.मात्र या इतिहासाला काळीमा फासणारी घटना तालुक्यात घडली.येथिल एका मिनिआटीआय मध्ये शिकणार्या अल्पवयीन विध्यार्थीनीचा विनभंग झाल.या घटनेने तालुक्यात संताप व्यक्त करण्यात आला.हे प्रकरण माध्यमानी उचलून धरले होते.

मात्र ही मिनिआयटीआय संस्था ज्या बल्हारपूर येथिल संस्थेशी सल्गनित होती त्या संस्थेत मोठाच घोळ असल्याची चर्चा होती.बल्हापूरातील त्या संस्थेवर विषय येताच माध्यमानी चूप्पी साधली.अचानक माध्यमानी चूप्पी साधल्यामुळे तालुक्यात याची ” अर्थ ” पुर्ण चर्चा सूरू आहे. ज्या संस्थेत हा प्रकार घडला वास्तविक त्या संस्थेतील सर्वच कारणामे पुढे येणे गरजेचे होते मात्र तसे झाले नाही. दरम्यान त्या संस्थेची पुर्ण चौकशी करण्याची मागणी नागरिक करित आहेत.