भीम आर्मी चे जिल्हाप्रमुख दिवंगत राजूभाऊ देवगडे यांची शोकसभा संपन्न

0
262
Advertisements

 

जिल्हा शाखेचे आयोजन,अनेक मान्यवरांची उपस्थिती

चंद्रपूर/ रविंद्र रायपुरे (कार्यकारी संपादक)

Advertisements

चंद्रपूर जिल्हा भीम आर्मीचे जिल्हाप्रमुख राजुभाऊ देवगडे यांचे कोरोना संसर्गाने दिनांक 26/ 9/2020 रोज शनिवारला नागपूर येथे उपचारादरम्यान दुःखद निधन झाले. त्यांच्या स्मृतीस अभिवादन व श्रद्धांजली अर्पण करण्याकरिता भीम आर्मी जिल्हा शाखा व चंद्रपूर शहरातील समस्त आंबेडकरी चळवळीतील जनतेकडून खोबरागडे काम्प्लेक्स येथील सभागृहात दिनांक 28/9/2020 रोज सोमवारला सायंकाळी 4 वाजता शोकसभेचे आयोजन करण्यात आले.

रिपाईचे जेष्ठ नेते मा. खुशाल तेलंग सर हे शोकसभेच्या अध्यक्षस्थानी होते, तर आंबेडकरी विचारवंत प्रा. कोमल खोबरागडे, भीम आर्मी जिल्हा वरिष्ठ उपाध्यक्ष मा. शंकर मून, जिल्हा उपाध्यक्ष मा.मदन बोरकर, जिल्हा महासचिव मा.सुरेंद्र रायपुरे, रिपाईचे मा. देशकभाऊ खोब्रागडे, यांच्या प्रमुख उपस्थितीत शोकसभा पार पडली. सदर सभेला चंद्रपुरातील आंबेडकरी चळवळीतील अनेक मान्यवर उपस्थित होते.

अध्यक्ष महोदय तथा उपस्थित मान्यवरांनी राजूभाऊ देवगडे यांच्यात असलेले अप्रतिम संघटन कौशल्य,सामाजिक बांधिलकी व समाजाप्रती तळमळ, राजकारणातील मुसद्दी व प्रामाणिकपणा, कार्यकर्ता व मित्राच्या अनेक अडचणीला वेळीच धावून जाण्याची तत्परता हे अंगी असलेल्या विविध गुणा संबंधी उपस्थितांसमोर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.

त्याचप्रमाणे वंचित बहुजन आघाडीचे सुरेश नारनवरे, अंकुश वाघमारे,बंडूभाऊ नगराळे,भारत रंगारी, संतोष डांगे, रिपब्लिकन सेनेचे तथागत पेटकर, भीमशक्तीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष नामदेव पिंपळे, रिपाई (आठवले( चे राजू भगत, चोखामेळा वस्तीगृहाचे संचालक महाबोधी पुनवटकर,बसपाचे डाॅ.ज्ञानेश्वर राऊत, भीम आर्मी जिल्हा उपाध्यक्ष रविंद्र रायपुरे, चंद्रपूर महानगर प्रमुख प्रशांत रामटेके,वरोरा तालुकाप्रमुख शुभम गवई, या समस्त मान्यवरांनी दिवंगत राजूभाऊ देवगडे यांच्या अकाली निधनाने सामाजिक ,राजकीय व आंबेडकरी चळवळीतील न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली अशा संवेदनशिल भावना उपस्थितांसमोर व्यक्त केल्या सदर शोकसभेचे सूत्रसंचालन भीम आर्मी चे जिल्हा प्रवक्ता जितेंद्र डोहणे व प्रास्ताविक भीम आर्मी चे अमोल खोब्रागडे यांनी केले.

Advertisements

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here