खते वाटप करताना कृषी केंद्र चालकाकडून सोशल डिस्टन्श चा फज्जा

0
601

शासनाचे नियम ढाब्यावर बसवून खत विक्री.

गोंडपिपरी/आकाश चौधरी

तालुक्यात पावसाने हजेरी लावल्याने धान पिकासह इतरही पिकांना दिलासा मिळाला. पाऊस आल्याने शेतकऱ्यांनी खतासाठी कृषी केंद्रात एकच गर्दी केली.त्यामुळे सोशल डिस्टन्श चा फज्जा उडाल्याचे चित्र तालुक्यात सर्वच कृषी केंद्रात पहायला मिळाले
शासनाकडून कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मॅक्स वापरण्याची शक्ती केली आहे. मॅक्स न वापरल्यास पाचशे रुपये दंड आकारण्यात येणार आहे. मात्र दुकान चालक व तेथील काम करणाऱ्यांनी मॅक्स चा वापर केलेला नसल्याने शेतकऱ्यांसोबत इतरही नागरिकात कोरोनाचा संसर्ग वाढण्याची दाट शक्यता आहे.
शासनाने कोरोना संसर्ग रोखण्याकरिता नियम लावून दिलेत त्याबाबत कृषी अधिकारी पंचायत समिती यांनी सूचना व नियमाचे पत्र कृषी केंद्रांना पाठवण्यात आले. त्यामध्ये कृषी केंद्र चालकांनी दुकानात गर्दी टाळण्याकरिता शेतकऱ्यांना त्यांच्या गावात खताचा पुरवठा करावा अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या होत्या. सोबत दुकानात येणार्‍या ग्राहकामुळे कोरोना संसर्ग वाढणार नाही यासाठी काळजी घेण्यात यावे. दुकानात हात धुण्यासाठी पाणी,साबन आणि सॅनिटायझर ची व्यवस्था करावी व सामाजिक अंतर राखण्याबाबत ची व्यवस्था व मार्क्स वापर करण्याकरिता सूचना दिल्या सूचनेचे कठोर पालन करावे अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे पत्रात स्पष्ट लिहिले आहे. मात्र तालुक्यातील एकही कृषी केंद्रात नियमाचे पालन होताना दिसत नाही त्यामुळे कृषी केंद्रावर कारवाई करणार का? असा प्रश्न शेतकरी वर्ग करीत आहे.
सध्या तालुक्यात युरिया खताची टंचाई आहे. त्यामुळे खताची मागणीत वाढली आहे. त्यामुळे दुकानदारांकडून जास्त किमतीत खत विकल्या जात असल्याची चर्चा सुरू आहे.
——————————————–

*ग्रोमर खत घ्याल तरच मिळणार युरिया खत*

कृषी केंद्र चालकाकडे ग्रोमर खतचा साठा मोठ्या प्रमाणात असल्यामुळे ते खत विक्री व्हावे म्हणून ग्रोमर खत घेणाऱ्याना युरिया खत मिळेल अशी शेतकऱ्यांना सक्ती करण्यात आली आहे.शेतकऱ्यांना त्या खताची गरज नसताना सुद्धा ग्रोमर खत द्यावे लागत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सोसावे लागत आहे.

——————————————
तालुक्यातील सर्व कृषी केंद्र चालकांना कोरोना संसर्ग रोखण्याकरीता उपयोजना करन्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यांच्याकडून या सूचनेचे पालन न केल्यास कारवाई करून.

मंगेश पवार
तालुका कृषी अधिकारी, गोंडपिपरी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here