गडचीरोली जिल्हयात एकाचा मृत्यू  ; नवीन 85 कोरोना बाधितांची नोंद

0
353
Advertisements

गेल्या चोवीस तासात 36 जण कोरानामुक्त

गडचीरोली प्रतिनिधी/सतीश कुसराम

Advertisements

जिल्हयात आज गडचिरोली विवेकानंद नगर येथील 55 वर्षीय पुरूषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. तो हायपर टेन्शन आणि मधुमेह ग्रस्त होता. तसेच आज नवीन 85 कोरोना बाधितांचीही नोंद झाली तर 36 जण कोरोनामुक्त झाले. यामुळे जिल्हयातील सक्रिय कोरोना बाधित संख्या 538 झाली. आत्तापर्यंत एकुण बाधित 2171 रूग्णांपैकी 1618 जणांनी कोरोनावर मात केली आहे. आत्तापर्यंत 15 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

नवीन 85 बाधितांमध्ये गडचिरोली 24 यामध्ये नेहरू वार्ड 1, गोगाव 1, गड 5, जिल्हा परिषद 7, एसआरपीएफ 1, रामपुरी 1, हनुमान वार्ड 1, कारगिल चौक 1, नवेगाव 1, नागभीड वरून आलेला 1, वनश्री कॉलनी 1, नंदनवनघर 1, रामनगर 1 यांचा समावेश आहे. एटापल्ली 3 यात बुर्गी गावातील 1, जारावंडी 2 यांचा जणाचा समावेश आहे. कोरचीमध्ये स्थानिक 3 कोरोना बाधित आढळले. वडसामध्ये आज 13 बाधित आढळले यात राजेंद्र वार्ड 1, सीआरपीएफ 2, सावंगी 1, कोंढाळा 1 कोकडी 1, कुरूड 2 , माता वार्ड 1, हनुमान वार्ड 1, आंबेडकर वार्ड 1, विसोरा 1, वडसा 1 यांचा समावेश आहे. आरमोरी येथील 12 यामध्ये स्थानिक 6, देऊळगाव 6 जणांचा समावेश आहे. चामोर्शी 10 यात आष्टी 2, चामोर्शी 4, आमगाव 2 घारगाव 1, डोंगरगाव 1 जणाचा समावेश आहे. मुलचेरा सुंदरनगर येथील 1 जण बाधित आढळला. धानोरा ४ यात स्थानिक 2 व चातगाव 2, अहेरी येथील 8 जणांमध्ये महागाव 5, शहर 2, जिमलगट्टा 1 यांचा समावेश आहे. सिरोंचा 7 यात वार्ड नं.3 मध्ये 1, वार्ड नं.7 मध्ये 3, वार्ड नं.6 मध्ये 3 जण बाधित आढळले. तसेच कुरखेडा मधील 1 जणांचा समावेश आहे.

एकुण सक्रिय कोरोना बाधितांपैकी जिल्हयात वेगवेगळया तालुक्यातील 36 जण कोरोनामुक्त झाले. यामध्ये अहेरी 2, आरमोरी 5, चामोर्शी 3, धानोरा 2, गडचिरोली 19, मुलचेरा 1, सिरोंचा 3 व वडसा येथील 1 जणांचा समावेश आहे.

Advertisements

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here