Homeगडचिरोलीगोंडपिपरी शहरातील मोकाट जनावरांचा प्रश्न सूटणार;पुन यांच्या मागणीची दखल

गोंडपिपरी शहरातील मोकाट जनावरांचा प्रश्न सूटणार;पुन यांच्या मागणीची दखल

गोंडपिपरी

माजी बांधकाम सभापती तथा नगरसेवक राकेश पून यांनी मोकाट जनावरांचा प्रश्न निवेदनातून नगर पंचायत कडे उचलून धरला. दिलेल्या निवेदनाची दखल घेत  मागणीनुसार शहरातील मोकाट जनावरांना पकडून कोंडवाड्यात टाकल्यानंतर कोंडवाडा शुल्क कमी आहे. याचा फायदा घेत असल्यामुळे जनावरांच्या मालकांनी हे नगरपंचायतचे नेहमीचेच कारण असल्याने ते जनावरे सोडवून घेत आहेत. तसेच मोकाट सोडतात त्याकरिता नगरपंचायतच्या माध्यमातून राकेश पून यांनी हा विषय मासिक सभेत ठेवून यावर चर्चा केली. अंमलबजावणी करण्याकरिता प्रश्न उपस्थित करून नगरपंचायत च्या सभेत नव्याने ठराव पारित करण्यात आला.
तो याप्रमाणे तीन दिवसांपर्यंत एक हजार रुपये शुल्क दंड असेल नंतर प्रत्येक दिवसाचे शंभर रुपये प्रमाणे वाढ व जनावरांना दहा दिवसाच्या आत सुटका न केली असता अकराव्या दिवसानंतर जनावरांचा लिलाव करता येणार याकरिता ठराव पारित करण्यातआला आहे.
तरी नागरिकांनी आपली जनावरे मोकाट न सोडता आपल्याच घरी बांधून ठेवावी असे नगरपंचायत च्या माध्यमातून कळविण्यात येत आहे.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!