Home Breaking News लाॕकडाऊनला गोंडपिपरी व्यापारी संघटनेचा तिव्र विरोध

लाॕकडाऊनला गोंडपिपरी व्यापारी संघटनेचा तिव्र विरोध

गोंडपिपरी-आकाश चौधरी

कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी व्यापारपेठ बंद ठेवणे हा एकमेव उपाय नाही. गोंडपिपरी तालूक्यात कोरोनाचा शिरकाव जबादार शासकीय अधिकाऱ्यांमार्फत झाले. तसेच शहरात ये-जा करणा-या कर्मचा-याव्दारे कोरोनाचा फैलाव होत आहे. असे असताना व्यापारपेठ बंद करुन व्यापा-याना वेठीस धरने योग्य नाही. परत लाॕकडाऊन गोंडपिपरी व्यापा-यांवर लादल्यास त्याचा तिव्र विरोध करु असा पवित्रा घेतला असल्याचे गोंडपिपरी व्यापारी असोसिऐशनी आज गजानन काॕलेजमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले

सुरुवातीला देशावरील आपत्ती म्हणुन सर्व व्यापारी बांधवानी आपला व्यापार बंद ठेवुन सहकार्य केले.  बाजारपेठ बंदीमुळे व्यापा-यांचे कंबरडे मोडले असताना शासनाकडून कुठल्याही सवलतीची अपेक्षा केली नाही. उलट विजेचे बिल, ईएमआयचे हप्तेही मुकाट्याने भरले. असे असताना परत लाॕकडाऊन करुन व्यापा-यांनाच वेटीस धरणे चालु आहे. जेंव्हा की व्यापारी प्रतिष्ठानापेक्षा सरकारी कार्यालये, बँकामध्ये अधिक गर्दी होत असते. तसेच अनेक कंन्टेनमेन्ट झोनमधुन गोंडपिपरी येथिल शासकीय कार्यालयात पाचशे ते सहाशे कर्मचारी रोज ये-जा करीत असतात. त्यांच्यामुळे शहरात कोरोनाचा फैलाव होत आहे. संक्रमन वाढविणा-या शासकीय अधिकारी व कर्मचा-यावर कुठलीही कारवाई नाही पण उगाचच व्यापा-यांनाच वेटीस धरले जाते. हा शासन व प्रशासनाचा कुठला न्याय आहे? असा रोखठोक जाब गोंडपिपरीतील व्यापा-यांनी विचारला आहे.

होय !…तरच लाॕकडाऊनला समर्थन !!

खरोखरच गर्दीमुळे संसर्ग वाढत असेल तर सरकारी कार्यालये, बँका व गर्दी होणारी सर्वच स्थळे बंद करण्यात यावे.
जसे बंदीमूळे व्यापा-याचे आर्थिक नुसकान होते तसेच  सरकारी कर्मचाऱ्यांनाही पगार देवु नये. शासकीय कर्मचा-याने कोरोना फैलाव करण्याचे पाप करावे आणि व्यापा-याना आर्थिक व मानसिक मनस्ताप सहन करावे. असे मुळीच चालणार नाही. असा संताप व्यापाऱ्याने व्यक्त केला. अन्यायकारक लाॕकडाऊन लादल्यास गोंडपिपरी व्यापारी संघटना तिव्र विरोध करणार असे व्यापा-याने सांगितले.

पत्रकार परिषदेत संघटनेचे अध्यक्ष मोरेश्वर सुरकर, उपाध्यक्ष रितेश वेगिनवार, सचिव अजय माडूरवार व व्यापारी निलकंठ गौरकर,सुहास माडुरवार, प्रदिप बोनगिरवार, अमित वेगिनवार, विष्णु हिवरकरसह अनेक व्यापारी उपस्थित होते.

India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
मुन्ना तावाडे | मुख्य संपादक, 9096780556
RELATED ARTICLES

मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यायला तयार; उद्धव ठाकरेंनी बंडखोरांना स्पष्टच सांगितले.

राज्यात शिवसेनेचे मातब्बर नेते तथा मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर राज्यातील राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. एकनाथ शिंदेंसोबत सर्व बंडखोर आमदार सध्या गुवाहटीमध्ये...

जागतिक योगादिनी मास्टर कुंदन पेंदोर सन्मानित

-सिद्धार्थ दहागावकर (गोंडपिपरी तालुका प्रतिनिधी) गोंडपिंपरी:- मागील तीन वर्षापासून तालुक्यातील विविध शाळेवर जाऊन निशुल्क योगा व कराटेचे प्रात्यक्षिक दाखवून विद्यार्थ्यांमध्ये आत्मसंरक्षणाचे धडे देणारे कराटे प्रशिक्षक...

ग्रामस्थांच्या समस्यांचा तात्काळ निपटारा करा- शिवानी वडेट्टीवार

चंद्रपूर - चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी मतदार संघात राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन तथा चंद्रपूर जिल्हा पालकमंत्री ना.विजय वडेट्टीवार यांनी विकासात्मक दूरदृष्टी कोनातून मोठ्या...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

जन्मताच आईचे मातृत्व हरवलेल्या आदेशचे स्वतःची सायकल असण्याचे स्वप्न कर्मयोगीने केले पूर्ण…

नागपूर: १० दिवसापूर्वी संध्याकाळच्या वेळेला जवळपास ७ वाजले होते,अचानक एक कॉल आला. तो कॉल होता बिबी (सावळी ) त. हिंगणा जि. नागपूर या गावातील...

मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यायला तयार; उद्धव ठाकरेंनी बंडखोरांना स्पष्टच सांगितले.

राज्यात शिवसेनेचे मातब्बर नेते तथा मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर राज्यातील राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. एकनाथ शिंदेंसोबत सर्व बंडखोर आमदार सध्या गुवाहटीमध्ये...

जागतिक योगादिनी मास्टर कुंदन पेंदोर सन्मानित

-सिद्धार्थ दहागावकर (गोंडपिपरी तालुका प्रतिनिधी) गोंडपिंपरी:- मागील तीन वर्षापासून तालुक्यातील विविध शाळेवर जाऊन निशुल्क योगा व कराटेचे प्रात्यक्षिक दाखवून विद्यार्थ्यांमध्ये आत्मसंरक्षणाचे धडे देणारे कराटे प्रशिक्षक...

ग्रामस्थांच्या समस्यांचा तात्काळ निपटारा करा- शिवानी वडेट्टीवार

चंद्रपूर - चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी मतदार संघात राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन तथा चंद्रपूर जिल्हा पालकमंत्री ना.विजय वडेट्टीवार यांनी विकासात्मक दूरदृष्टी कोनातून मोठ्या...

Recent Comments

Don`t copy text!