गडचीरोली जिल्हयात आज 7 कोरोनामुक्त तर 62 नविन कोरोना बाधित

0
214
Advertisements

 

गडचीरोली/ प्रतिनिधी सतीश कुसराम

जिल्हयात आज गडचिरोली शहरातील 25 कोरोनाबाधितांसह जिल्हयात 62 कोरोनाबाधितांची नोंद झाली. तर आज 7 जण कोरोनामुक्त झाले. त्यामुळे जिल्हयातील सक्रीय कोरोनाबाधीतांची संख्या 287 झाली. आतापर्यंत जिल्हयात एकूण 1161 जण कोरोनाबाधीत झाले आहेत. त्यापैकी 873 जणांनी यशस्वीरीत्या कोरोनावर मात केली आहे.

Advertisements

आज गडचिरोली शहरात 25 बाधीत आढळून आले. यामध्ये कोरोना बाधिताच्या संपर्कातील गुलमोहर कॉलनी, पंचवटी कॉलनी, कलेक्टर कॉलनी, सर्वोदय वार्ड येथील रुग्णांचा समावेश आहे. आरमोरी तालुक्यातील 8 बाधितांमध्ये विलगीकरणात ठेवलेल्या शिपाई रुग्णाच्या संपर्कातील 8 जणांचा समावेश आहे. अहेरी येथील 2, धानोरा येथील 3 सीआरपीएफ जवान, कोरची येथील विलगीकरणातील 4 जण, सिरोंचा मधील रुग्णाच्या संपर्कातील 4 जण, तर कुरखेडा येथील 14 जण कोरोनाबाधितांच्या संपर्कातील कोरोना बाधित असल्याचे आढळून आले. मुलचेरा व चामोर्शी मधील प्रत्येकी एक एक जण कोरोनाबाधित आढळून आला.

आज जिल्हयात 7 जन कोरोनामुक्त झाले. यामध्ये धानोरा 1 अहेरी 2 चामोर्शी 3 आणि गडचिरोली 1 इत्यादींचा समावेश आहे

Advertisements

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here