डायरेक्टर एक्टर प्रवीण विठ्ठल तरडे या माथेफिरू वर राष्ट्रद्रोहाचा फौजदारी गुन्हा दाखल करा 

0
83
Advertisements

 

बहुजन समाज पार्टी चंद्रपूर यांची मागणी

चंद्रपूर प्रतिनिधी /कैलास दुर्योधन

Advertisements

चंद्रपूर

प्रवीण तरडे या सिनेमा अभिनेत्याने त्यांच्या घरात यंदाचा आमचा पुस्तक बाप्पा गणपती बाप्पा मोरया
असे लिहीत भारतीय संविधानावर गणपती मूर्ती बनवण्याचा फोटो 22/08/20 त्याच्या प्रवीण विठ्ठल तरडे या नावाने फेसबुक खात्यावरून प्रसिद्ध केला आहे .

त्यांचे हे खोडसाळ कृत्य सर्व भारतीय समाजात सामाजिक तेढ निर्माण करून सामाजिक व राष्ट्रीय भावना दुखावणारे व घडविणारे आहे .

तो कुठे राहतो त्याचा शोध घेऊन त्यांच्यावर संबंधित पोलिस स्टेशनमध्ये कायदेशीर कारवाई करीत राष्ट्रद्रोहाचा फौजदारी गुन्हा भारतीय संविधान अनुछेद 51(क) नुसार आणि दंड संहिता 1860 च्या कलम 124 (अ) फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा असे निवेदन चंद्रपूर जिल्ह्या पोलिस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी व दुर्गापूर पोलिस निरीक्षक खोब्रागडे यांना निवेदन देण्यात आले.

प्रविन तरडे फिल्म डायरेक्टरवर गुन्हा होत नसेल तर अन्यथा बहुजन समाज पार्टी जिल्हा चंद्रपूर च्या वतीने आपल्या कार्यालया समोर दोन दिवसानंतर तिव्रगतीचे आक्रोश पद्धतीने जन आंदोलन उभा करण्यात येईल ,अशी मागणी बहुजन समाज पार्टी चे जिल्हा सचिव विनित एस.तावाडे यांनी केले आहे.जिल्हा उपाध्यक्ष विशालभाऊ बोरकर, विशाल दुर्योधन दुर्गापूर सेक्टर अध्यक्ष, राजेश बोरकर, सुरेश दुर्योधन, सुरज दुर्गे व अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Advertisements

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here