बेजबाबदार बिडीओवर कार्यवाही करा ;तालुका काॅग्रेस कमेटीची मागणी

0
130

 

कोरोना संकटकाळात नियमांची पायमल्ली

गोंडपिपरी :-

गोंडपिपरी पंचायत समितीच्या बिडीओंनी कोरोनाच्या संकटात नियमांची पायमल्ली केली.नागपूरला नातेवाईकांचा वाढदिवस साजरा करून ते गोंडपिपरीत परतले.ना तपासणी केली,ना आरोग्य प्रशासनाला माहिती दिली.अखेर लक्षणे आढळली,अन बिडीओ पाॅझिटिव्ह निघाले.त्यांच्यासोबत ये-जा करणारा ग्रामसेवकही बाधित निघाला.हा सर्व गंभीर प्रकार बेेजबाबदारपणाची हद्द पार करणारा ठरला.याची झळ तालुकावासियांना सोसावी लागली.यामुळे नियमांची पायमल्ली करणाऱ्या बिडीओवर कार्यवाही करावी,अशी मागणी गोंडपिपरी तालुका काॅग्रेस कमेटीने केली आहे.शुक्रवारी या संदर्भात जिल्हाधिकार्याना निवेदन देण्यात आले.

एकीकडे जिल्हा प्रशासन कोरोनावर मात करण्यासाठी जनजागृती व कडक कार्यवाही करण्याबाबतचे नियोजन करित आहेत.दुसरीकडे मात्र प्रशासनातील काही बेजबाबदार अधिकारी कमालीचा निष्काळजीपणा दाखवित आहेत.असाच काहीसा प्रकार गोंडपिपरीत घडला.गोंडपिपरीचे संवर्ग विकास अधिकारी आणि ग्रामसेवक नागपूरला गेेले.वाढदिवसाचा जल्लोष साजरा करून ते गोंडपिपरीला परतले.अशावेळी नागपूराहून परतल्यानंतर आरोग्य तपासणी करणे वा यंत्रणेला प्रवासाची माहिती देणे जबाबदार अधिकारी म्हणून बंधनकारक होते.पण त्यांनी थेट पंचायत समितीचा कारभार सुरू केला.काही दिवसानंतर लक्षणे जाणवू लागल्याने त्यांनी तपासणी केली,अन रिपोर्ट पाझिटिव्ह आला.त्यांच्यासोबत ग्रामसेवकही संक्रमित निघाले.दरम्यान या दिवसात पंचायत समितीतील अनेक कर्मचा-यांशी त्यांचा संपर्क आला.या संपुर्ण प्रकारामुळे पंचायत समिती कार्यालय अनेक दिवस बंद राहिले.विकासकामावर याचा मोठा परिणाम झाला.या संपुर्ण प्रकरणी गोंडपिपरीचे बिडीओंनी कमालीचा बेजबाबदारपणा दाखविला.या प्रकारामुळे संतप्त झालेल्या तालुका काॅग्रेस कमिटीने अशा बेजबाबदार अधिका-यावर कार्यवाहीची मागणी केली आहे.आपत्ती व्यवस्थापन आणि साथरोग प्रतिबंधीत कायद्यानुसार कार्यवाही करण्याची मागणी जिल्हाधिका-यांना दिलेल्या निवेदनातून त्यांनी केली आहे.यावेळी काॅग्रेसचे तालुकाध्यक्ष तुकाराम झाडे,बाजार समितीचे उपसभापती अशोक रेचनकर,नामदेव सांगडे,संतोष बंडावार,मनोज नागापूरे,प्रविण नरहरशेटटीवार,प्रदीप झाडे,बालाजी चनकापूरे,संजय झाडे,रामकृष्ण सांगडे आदिंची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here