मुलचेरा तालुक्यातील भगतनगर येथे दोन मुलांना जलसमाधी

0
124

 

गडचिरोली:प्रतिनिधी प्रशांत शाहा

Advertisements

खाजगी बोडीत पडून दोन मुलांचा मृत्यू झाल्याची घटना काल दि.22 ऑगस्ट रोजी दुपारच्या दरम्यान मुलचेरा तालुक्यातील भगतनगर येथे घडली.रोहन रतन बेपारी (9) आणि संजीव सुशेन भक्त (9) असे मृतकांचे नाव आहेत.
भगतनगर मुख्य चौकलगत असलेल्या एका खाजगी बोडीत दोन मुले पडल्याची माहिती काल दुपारी 2:30 वाजताच्या दरम्यान गावकऱ्यांना मिळाली,येथील माजी उपसरपंच निखिल इज्जतदार आणि गावकऱ्यांनी लगेच धाव घेऊन त्या बोडीत शोध घेतले असता दोन्ही मुलांचे मृतदेहच आढळून आले.
याची माहिती मिळताच महसूल विभागाचे कर्मचारी, मुलचेरा पोलीस स्टेशनचे अधिकारी मिलिंद पाठक आणि त्यांच्या चमुनी घटना स्थळाला भेट देऊन मोका पंचनामा करून दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविले.काल सायंकाळच्या दरम्यान शवविच्छेदन करून मृतदेह घरच्यांच्या स्वाधीन करण्यात आले.
ऐन गणेश चतुर्थीच्या दिवशी बाप्पांच्या आगमनाची तयारी सुरू असताना गावातील दोन मुलांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण गावात शोककळा पसरली असून दोन्ही बालक केवळ 9 वर्षाचे असल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

Advertisements
Advertisements

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here