0
168

किरमीरीत आढळले पाच कोरोना बाधित

धाबा /अरूण बोरकर

कोठारी येथील कोरोना बाधित नातेवाईकांच्या संपर्कात आलेल्या किरमीरी येथील त्या नातेवाईकांचे संपूर्ण कुटुंबच कोरोना बाधित आढळून आले. या दोन्ही कुटुंबांच्या संपर्कात गावातील अनेक व्यक्ती आले आहेत.त्यामुळे गावात धाकधूक वाढली आहे.

कोठारी पोलीस स्टेशनला कार्यरत असलेला तो कर्मचारी गोंडपिपरी तालुक्यात येणाऱ्या किरमीरी येथील एका कुटुंबीयांचा नातेवाईक आहे. कोठारीच्या या कर्मचार्याची शेती किरमीरी येथे आहे. धानाची रोवणीसाठी तो आणि त्याची पत्नी किरमिरी गावात दोन आठवड्यापासून थांबले होते. यादरम्यान त्यांना कोरोना सारखी लक्षणे जाणवली होती. पण त्यांनी वायरल फीवर समजून याकडे दुर्लक्ष केले.मात्र तपासणी केल्यावर ते दोघे कोरोनाबाधित निघाले. कोठारीचे हे दाम्पत्य ज्या नातेवाईकाकडे थांबले होते त्या कुटूंबीयांनी तपासणी केली. तपासणीत कुटुंबातील पाच जण कोरोना बाधित निघाले आहेत.कोरोना बाधितात पती-पत्नी,दोन मुले आणि त्यांचा घरी राहणाऱ्या 60 वर्षिय महीलेचा समावेश आहे. कोरोनाबाधित निघालेल्या या कुटूंबातील व्यक्तींचा गावातील अनेकाशी संपर्क आला आहे. त्यामुळे गावकर्यांची धाकधूक वाढली आहे.दरम्यान तालुका वैद्यकीय अधिकारी ,धाबा प्राथमिक आरोग्य केंद्राची वैद्यकीय चमू गावात दाखल झाली असून त्या कुटूंबाचा संपर्कात आलेल्या व्यक्तींची स्वब तपासणीसाठी सीवीसी सेंटर गोंडपिपरीला पाठविण्याची प्रक्रियासूरू केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here