शंभर वर्षाची परंपरा कोरोनामुळे खंडीत; भोयगाव तान्हा पोळ्यावर विरजन

0
140

कोरपना-  महाराष्ट्रात पोळा हा मोठ्या उत्साहात ग्रामीण भागात साजरा केला जातो. परंतु भोयगाव येथे तान्हा पोळा लाकडाचा बैला ऐवजी मातीच्या बैलाला सजवून तान्हा पोळा उत्साहात साजरा केला जातो परंतु यंदा कोरोना च्या संकटामुळे मोठ्या पोळ्या बरोबरच तान्हा ही पोळा भरणार नसल्याने लहान बालकांना हा उत्साह करता येणार नाही. कोरपना तालुक्यातील वर्धा नदी किनारी वसलेल्या भोयगाव येथे दरवर्षी पोळा भरवल्या जाते.या गावातील तान्हा पोळा शंभर वर्षाच्या पारंपारिक पध्दतीने भरवल्या जाते. सर्वीकडे तान्हा पोळा लाकडाच्या बैलाला सजावट करुन भरवल्या जाते परंतु या गावात लाकडाच्या बैला ऐवजी मातीच्या बैलाला सुंदर आकार देवुन त्याला सजवून व वेगवेगळ्या देखावे सुद्धा या प्रसंगी मातीच्या सहाय्याने बनवुन ठेवल्या जाते. मनमोहक दुष्य, सजावट आकर्षक असल्याने या परिसरातील जनता या ठीकाणी येवून गर्दी करुन वेगवेगळ्या सजावट पाहून आनंदी होवुन स्वतंत्र बक्षीस ही देत असतात. भोयगाव या ग्रामपंचायत च्या वतीने हा पोळा भरवल्या जाते उत्कृष्ट सजावट व देखाव्याना ग्रामपंचायतिच्या वतीने बक्षीस ही देण्यात येते.या तान्हा पोळा मोठ्या शेतकऱ्यांन सोबत लहान मुलांचाही तान्हा पोळा भरवल्या जाते. लहान मुलांना सुद्धा बक्षीस देण्यात येतात. भोयगाव येथे अनुराग गावंडे, दतू मते, दत्तू काशीपीटा, रोहीत बोडे, किरण पिंपळशेंडे, मनोहर गावंडे, दिलीप पाणघाटे, नवनाथ पारखी, सुभाष माशीरकर व अन्य हे माती आणुन दोन दिवसापूर्वी पासुन मातीचे बैल बनवीत असतात विविध देखावे, सामाजिक उपदेश ही या माध्यमातून दिल्या जाते परंतु यंदा कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे या सणाच्या उतसावर पाणी फेरले आहे तर लहान बालकांचा हिरमोड झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here