संविधान सत्याग्रह यात्रेत गडचिरोली जिल्ह्यातील पदयात्र्यांचा गौरव…

106

सहसंपादक श्याम मशाखेत्री

नागपूर ते सेवाग्राम अशी निघालेली संविधान सत्याग्रह यात्रा गेल्या चार दिवसांपासून सातत्याने पायी चालत अखेर वर्धा येथे पोहोचली. या यात्रेत गडचिरोली जिल्ह्यातील पदयात्र्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे सहभाग नोंदवला असून त्यांच्या या चिकाटीचे व समर्पणाचे कौतुक राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी विशेष शब्दांत केले.

तुषार गांधी व हर्षवर्धन सपकाळ यांनी पदयात्र्यांना भेटून त्यांच्यासोबत संवाद साधला. पदयात्र्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांची दखल घेत त्यांनी छायाचित्रे काढून त्यांच्या कार्याचे कौतुक केले. *“या संविधान सत्याग्रह यात्रेत तुम्ही दाखवलेला उत्साह आणि प्रामाणिकपणा आगामी लढ्याला बळकटी देणारा आहे,”* असे प्रतिपादन करत दोन्ही नेत्यांनी पदयात्र्यांना प्रोत्साहित केले.

या कौतुकामुळे सर्व पदयात्र्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकला असून, त्यांनी आणखी जोमाने व श्रद्धेने यात्रेला पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त केला.
यावेळी