प्रतिनिधी सतीश कुसराम आरमोरी:
स्मार्ट /प्रिपेड इलेक्ट्रीक मिटर योजना बंद करा_ जुने मीटर बदलून घराघरात स्मार्ट इलेक्ट्रीक मीटर लावल्या जात आहेत .ज्यांच्या ज्याकडे हे नवीन मीटर लागले आहेत त्यांना पूर्वीपेक्षा फार जास्त रूपयाचे बिल दिल्या जात आहेत. त्यामुळे ग्राहक त्रस्त आहेत. महावितरण कंपनीने राज्यातील सर्व वीज ग्राहकांना स्मार्ट /प्रीपेड मीटर लावणार असल्याचे जाहीर केले आहे त्यामुळे प्रत्येकाच्या घरात स्मार्ट /प्रीपेड इलेक्ट्रीक मीटर लागणार आहेत. आज जरी या मीटर चे बिल वितरण केले जात असले तरी भविष्यात मोबाईल सारखा रिचार्ज मारून वीज वापरावी लागणार आहे व हे सामान्य ग्राहकांसाठी डोकेदुखी असनार आहे, महावितरण कंपनीने मंजूर केलेल्या टेंडर नुसार या स्मार्ट मीटरचा खर्च प्रति मीटर बारा हजार रुपये आहे .व हा पर्यायाने ग्राहकाकडून वसूल केल्या जाणार आहे . यासाठी महावितरण कंपनीने घेतलेला कर्ज व त्यावरील व्याज हा संपूर्ण ग्राहकांच्या खिशातून वसूल केल्या जाणार आहे .यामुळे विजेचे दर सुद्धा वाढविले जातील .आज ग्राहक येत असलेल्या विज बिलाने त्रस्त आहे ही महागडी वीज सामान्य ग्राहकांना परवडणारी नाही. यामुळे स्मार्ट /प्री -पेड मीटर ग्राहकांच्या संमतीशिवाय लावून नये .सध्याचे पोस्टपेड मीटर तसेच चालू ठेवावे यासंदर्भात दिनांक १ सप्टेंबर 2025 रोज सोमवारला ठीक बारा वाजता उप-कार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी चे कार्यालय आरमोरी समोर महाराष्ट्र राज्य किसान सभा जिल्हा गडचिरोली च्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले .व माननीय अधीक्षक अभियंता यांना निवेदन देण्यात आले .
व स्मार्ट /प्रीपेड इलेक्ट्रीक मीटर अमान्य असल्याचे वैयक्तिक अर्ज सादर करण्यात आले. सक्तीने स्मार्ट /प्रीपेड इलेक्ट्रिक मीटर लावू नका असी आग्रही मागणी करण्यात आली. व विविध लोकांच्या वैयक्तिक तक्रारीवर उप-कार्यकारी अभियंता आरमोरी यांच्याशी चर्चा करण्यात आली. व त्यांनी समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले .या आंदोलनाचे नेतृत्व डॉ. महेश कोपुलवार, कार्याध्यक्ष ,महाराष्ट्र राज्य किसान सभा का. देवराव चवडे जिल्हा अध्यक्ष का.प्रकाश खोब्रागडे ,ता.अध्यक्ष,मीनाक्षि सेलोकर ,विनोद झोडगे ,संजय वाकडे ,दिनेश दुमाने लक्ष्मण झरकर मारुती नरुले, त्र्यंबकराव राऊत ,हरिदास निकुरे ,विनोद रामटेके, ऋषी रामटेके ,सिताराम जेंगटे, ईश्वर बावणे, रोहीदास सहारे,
मनोज दामले ,अंबादास सहारे ,आत्माराम गावंडे, यशवंत वंजारे ,सुरेश शंभरकर , डोमाजी सहारे ,हरिदास मेंढे, कुसुबाई मेश्राम ,नेपाल बनकर , , चंद्रदत्त माटे इत्यादी प्रामुख्याने उपस्थित होते







