प्रतिनिधी संकेत कायरकर
वरोरा:- राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात नुकतेच राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या हस्ते प्रवेश करून अभिजित कुडे यांनी शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला जय महाराष्ट्र केला आहे. या आधी अभिजित यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष पद भूषविले आहे. अनेक संघटनेचे जिल्हाध्यक्ष पद देखील भूषविले आहे. युवकांची खूप मोठी ताकत त्यांच्या सोबत आहे. ग्रामीण भागातील शेतकरी पुत्र अभिजित कुडे यांनी जिल्ह्याच्या राजकारणात स्वतःची ओळख निर्माण केली आहे.

सामाजिक कार्याच्या माध्यमातून त्यांनी प्रस्थापित राजकारणी यांना जबर धक्का दिला आहे. त्यांचे संघटन कौशल्य आणि प्रामाणिक काम बघून त्यांना राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष पद मिळण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये त्यांची चांगली पकड आहे. अनेक आंदोलन, सामाजिक उपक्रम, आरोग्य शिबीर, रक्तदान, सर्व सामान्य माणसाच्या हाकेला धावून जाणारा युवक, शेतकरी, विद्यार्थी यांच्या प्रश्नाना वाचा फोडणारा आक्रमक चेहरा म्हणून त्यांची ख्याती आहे. अभिजित कुडे यांच्या नावाला सर्वांचीच पसंती असून लवकरच जिल्हा अध्यक्ष म्हणून त्यांची वर्णी लागणार आहे अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.







