गडचिरोली जिल्ह्यात शेतकऱ्यांना आमिष दाखवून परस्पर जमीन खरेदी करणाऱ्या दलालांवर कारवाई करून गुन्हे दाखल करा…

71

प्रतिनिधी सतीश कुसराम गडचिरोली:

भाजप प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार डॉ देवराव होळी यांची जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवदनाद्वारे मागणी

गडचिरोली जिल्ह्याच्या विविध भागात उद्योगासाठी जमीन द्या आम्ही योग्य मोबदला देवु व नोकरी देवु असे फसवे आश्वासन देवुन शेतकऱ्यांच्या जमिनी परस्पर खरेदी करणारी दलालांची टोळी सक्रिय झाली असुन शेतकऱ्यांची फसवणुक करणाऱ्या या दलालांवर कठोर कारवाई करून त्यांच्यावर गून्हे दाखल करा अशी मागणी भाजप प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार डॉ देवराव होळी यांनी जिल्हाधिकारी आविष्यांत पांडा व पोलिस अधीक्षक निलोत्पल यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

या निवेदनात त्यांनी मी आमदार असताना गडचिरोली जिल्ह्यात एक महिना उद्योगक्रांती यात्रा काढली होती. त्याचाच परिणाम म्हणून सूरजागड येथील लोहखाणीवर आधारीत कोनसरी येथे उद्योग प्रकल्प सुरु झाला. व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता गडचिरोली जिल्ह्यात स्टील हब निर्माण करण्याचा संकल्प घेतला आहे. व अनेक उद्योजक स्टील प्रकल्प उभारणीसाठी जिल्हयात येवू घातले आहे. याचा फायदा घेण्यासाठी महाराष्ट्र व ईतर राज्यातील काही दलाल सक्रिय झालेले आहे.

त्यामुळे गडचिरोली जिल्हयातील अहेरी, आलापल्ली, लगाम, इल्लुर, ठाकरी, भेंडाळा, मार्कडादेव, आमगाव (महाल), घोट, रेगडी, रेखेगाव, निमडर टोला, मारोडा, जामगिरी,आरमोरी, वडसा तालुका आणि जिल्हातील संपूर्ण तालुक्यातील इतर भागात गोरगरीब शेतक-यांना खोटे आमिष दाखवून जमिनीची परस्पर खरेदी करण्या-या दलालांचा सुळसुळाट झाला असून आम्हाला तुमची जमिन विक्री करा आम्ही तुम्हाला योग्य मोबदला व नोकरी मिळवून देवू असे खोटे आश्वासन देवून फसवणूक करणारी टोळी सक्रिय झाली आहे. काही शेतकरी या आमिषाला बळी पडले असून जो पर्यंत MIDC उद्योगासाठी जमिन अधिग्रहणाची अधिसूचना निर्गमित करत नाही तो पर्यंत शेतजमिन मालकांनी खाजगी व्यक्तींना परस्पर जमिन विक्री केल्यास त्याची शुद्ध फसवणुक होणार आहे . यात ईल्लुर येथील पेपर मील चा संदर्भ देत शेतजमीन मालकांनी आपली जमीन परस्पर खाजगी व्यक्तिला विक्री केली आता पेपर मील बंद झाली अन् वडिलोपार्जित जमीन खाजगी व्यक्तीच्या मालकीची झाली व नोकरीही गेली आता जमीन मालकावर उपासमारी चे संकट ओढवले आहे असे नमूद करीत गडचिरोली जिल्हयात खोटे आमिष दाखवून परस्पर शेतक-यांच्या जमिनी खरेदी करणारे दलाल शोधुन त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी व गुन्हे दाखल करावे अशी मागणी भाजप प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार डॉ देवराव होळी यांनी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदनातून केली आहे.