घोट रेगडी मार्गावर एखादा जीव गेल्यावरच प्रशासन जागे होणार का?…

151

शिवसेना जिल्हा सचिव प्रशांत शाहा यांचा प्रश्न

प्रतिनिधी/रेगडी

चामोर्शी: तालुक्यातील रेगडी हे गाव घोट येथून पंधरा किमी अंतरावर आहे

रेगडी या गावात जिल्ह्यातील सर्वात मोठा व एकमेव कन्नमवार जलाशय असल्यामुळे या स्थळावर नेहमीच वर्दळ असते तर येथील सामान्य माणसाला नेहमीच घोट व तालुका मुख्यालयात ये जा करावी लागते मात्र या पंधरा किलो मीटर रस्त्यावर पंधरा हजार खड्डे पडले असल्याने वाहन धारक, सामान्य माणूस त्या रस्त्याने कसे जावे हा चिंतनाचा विषय ठरला असून आता एखाद्याचा जीव गेल्यावरच प्रशासन जाग येईल का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे

सध्या पावसाळा सुरू असल्याने रेगडी येथील जलाशयाला विदर्भातील अनेक पर्यटक हजेरी देत आहे अश्यातच रेगडी घोट या खड्डेमय मार्गाची इतकी बिकट अवस्था

झाली आहे की, त्या मार्गाने चार चाकी वाहन जर आलेच तर त्या गाडीचे टप्पर मोडल्या शिवाय राहणार नाहीअशी अवस्था निर्माण झाली आहे

घोट रेगडी या मार्गावरील निकतवाडा ते नवेगाव दरम्यान खूप मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत त्या कडे लक्ष जाऊ नये याचे आश्चर्य वाटत आहे.

आता हे खड्डे कधी बुझविले जाणार या कडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे

विशेष म्हणजे भामरागड, एटापल्ली, मुलचेरा या तीनही तालुकावासियांना जिल्हा मुख्यालयी जाण्या करीता रेगडी मार्गच जवळचा असल्याने या मार्गावर नेहमी वाहनांची वर्दळ असते अश्यातच घोट रेगडी हा संपूर्ण पंधरा किमी चा मार्ग खड्डेमय झाला आहे

तरी या मार्गाची नूतनीकरण करण्यात यावी अशी मागणी शिवसेनेचे जिल्हा सचिव प्रशांत शाहा यांनी केली आहे लवकरात लवकर रस्त्याची दुरुस्ती न झाल्यास रास्तारोको आंदोलन करण्याचा इशारा देखील यावेळी शाहा यांनी दिला आहे.