*रेल्वेच्या विविध समस्या संदर्भात आ. करण देवतळे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक*

112

प्रतिनिधी संकेत कायरकर वरोरा:
भद्रावती तालुक्यात सुरू असलेल्या रेल्वेच्या तिसऱ्या लाईनच्या कामामुळे नागरिकांना भेडसावत असलेल्या अंडरपास, भूसंपादन, पाणी साचणे, शेतकऱ्यांचे नुकसान अशा विविध प्रश्नांवर ठोस तोडगा काढण्यासाठी आज (दि. 18/08/2025) उपविभागीय अधिकारी कार्यालय, वरोरा येथे आ. करण देवतळे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली.

या बैठकीस सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अमरजी राऊत, तहसीलदार वरोरा योगेशजी कौटकर, तहसीलदार भद्रावती राजेशजी भांडारकर, रेल्वे अधिकारी रवींद्रजी सिंग, नरेंद्रजी डोंगरे, सचिनजी ढोके, भूमी अभिलेखचे मिलिंदजी राऊत, सचिनजी पवार, बाळूभाऊ भोयर,सुधीरजी धामाट,चंद्रशेखरजी नोकरकार,वासुदेवजी उरकांडे, मनोज पाचभाई, संजय निब्रड, संजीव सक्सेना, मोहनजी रंगदळ, शामसुंदर उरकुडे, सुनील नामोजवर, प्रशांत डाखरे, रक्षिता नीरजने तसेच समस्याग्रस्त गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बैठकीत रेल्वेच्या कामामुळे निर्माण झालेल्या अडचणींवर चर्चा होऊन तात्काळ तोडगा काढण्याचे आश्वासन रेल्वे प्रशासनाने दिले. तसेच संबंधित स्थळांची पाहणी करून निर्णय घेण्यात आला.