मुंबई, दि. १८ ऑगस्ट २०२५ :
भारतीय जनता पार्टीच्या विस्तारित कोर कमिटीची महत्त्वपूर्ण बैठक आज मुंबई येथील भाजपा प्रदेश कार्यालयात उत्साहात संपन्न झाली. या बैठकीस माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
बैठकीदरम्यान पक्ष संघटन मजबूत करण्यासाठीच्या धोरणात्मक बाबी, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आखली जाणारी तयारी, विविध सामाजिक उपक्रमांचे नियोजन तसेच जनतेशी सातत्याने संवाद व संपर्क वाढविण्याच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली.
या बैठकीस प्रामुख्याने –भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री. रविंद्रजी चव्हाण,भाजपा संघटन मंत्री श्री. शिव प्रकाशजी,मंत्री श्री. आशिषजी शेलार, मंत्री श्री. चंद्रकांत दादा पाटील,श्री. गिरिशजी महाजन – मंत्री,श्री. विक्रांतजी दादा पाटील,श्री. विजयजी चौधरी,डॉ. उपेंद्रजी कोठेकर – विदर्भ प्रांत संघटन मंत्री, भाजपा यांसह अनेक मान्यवर मंत्री, पदाधिकारी व नेते मोठ्या संख्येने उपस्थित राहून चर्चेला दिशा दिली.