*दैव खेळ हा कुणा न टळला..* *कळी उमल्यान्याआधीच नियतीने खेळ साधला…*

128

*दैव खेळ हा कुणा न टळला..*
*कळी उमल्यान्याआधीच नियतीने खेळ साधला…
जिल्हा संपादक श्याम मशाखेत्री
चंद्रपूर: सिंदेवाही शहरातील महालक्ष्मी नगरातील दोन शाळकरी मुलांचा नदीत फुटबॉल खेळत असताना बुडून मृत्यू झाला.ही दुर्दैवी घटना 16 ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजता घडली.या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.जित वाकडे वय 16 वर्ष आणि आयुष गोपाले वय 15 वर्ष अशी मृतकांची नावे आहे.दुपारच्या सुमारास दहा ते बारा मुले टेकरी गावाजवळील नदीत पोहण्यासाठी गेले.ते फुटबॉल सह नदीत उतरून पाण्यात फुटबॉल खेळण्यास सुरूवात केली.खेळताना अचानक जित व आयुष यांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते दोघेही बुडू लागले.सोबत असलेल्या मित्रांनी त्यांना वाचवायचा प्रयत्न केला पण तो निष्फळ ठरला…