Homeचंद्रपूरसावली प्रभागातील रस्त्याचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे कंत्राटदारावर कार्यवाही करण्यात यावी -...

सावली प्रभागातील रस्त्याचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे कंत्राटदारावर कार्यवाही करण्यात यावी – नगरसेवक सतिश बोम्मावार यांची मागणी

सावली: येथील नगरपंचायत सावली येथे महात्मा ज्योतिबा फुले ते नंदू वाढई यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता तसेच मार्कंडऋषी मंदिर ते विलास दिकोंडवार यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता निकृष्ठ दर्जाचे कामे करण्यात आले असून देयके थांबवून संबंधित कंत्राटदारावर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी सावली भाजपा नप गटनेता,नगरसेवक सतिश बोम्मावार यांनी नगरपंचायत चे मुख्याधिकारी यांना निवेदनातून केली

नगरपंचायत सावलीच्या मार्फतीने नगराच्या विकासाकरिता महात्मा जोतीबा फुले ते नंदू वाढई यांच्या घरापर्यंत व मार्कंडेय ऋषी मंदिर ते विलास दिकोंडवार यांच्या घरापर्यंत नवीन सिमेंट रस्त्याचे बांधकाम दोन महिन्यापूर्वी झाले.लाखो रुपये खर्चून सदर रस्त्याचे बांधकाम अल्पवधीत उखळायला सुरुवात झाली आहे.तर काही ठिकाणी रस्त्यावरवरील गिट्टी निघत आहे.याचा अर्थ कंत्राटदार यांनी योग्य रित्या शासनाच्या परिपत्रक प्रमाणे लागणारे साहित्याचा वापर केला नाही.तसेच नप चे बांधकाम विभाग ही याकडे दुर्लक्ष केले आहे.

रस्त्याचे बांधकाम करत असतांना कंत्राटदाराने निकृष्ठ दर्ज्याचे साहित्य वापरल्याने रस्त्याचे गीटी,सिमेंट संपूर्ण उखळल्ले असून जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे त्या प्रभागातून जनतेच्या मागणीनुसार सदर कामाचे दुरुस्तीकरन करण्यात यावे व देयके थांबवून संबंधित कंत्राटदारावर कार्यवाही करण्यात यावी. अशी मागणी जनतेच्या वतीने नगरसेवक सतीश बोम्मावार यांनी केली आहे.

*बॉक्स*
लवकरच कामाची दुरुस्ती करु व जो पर्यंत काम दुरुस्त होणार नाही तो पर्यंत संबंधित कंत्रटदाराचे देय्यके काढणार नाही
:- मुख्याधिकारी, नगरपंचायत सावली

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!