तेंदुपत्ता संकलन करण्यासाठी गेलेल्या महिलेवर वाघाने घातली झडप; महिला ठार… गडचिरोली जिल्ह्यातील घटना

623

गडचिरोली :- गडचिरोली तालुक्याच्या सावरगाव जंगल परिसरातील आंबेशिवणी नजीकच्या कक्ष क्रमांक- ४११ मध्ये तेंदुपत्ता संकलन करण्यासाठी गेलेल्या महिलेवर दबा धरुन बसलेल्या वाघाने घातली झडप घेऊन ठार केल्याची घटना आज दिनांक- १४ मे रोजी सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास उघडकीस आली.

प्राप्त माहितीनुसार, सदर महिला ही आंबेशिवणी येथील रहिवासी असून पार्वता बालाजी पाल वय ६४ वर्षे असे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. गावातील व परिसरातील नागरिक सध्याच्या घडीला मोठ्या प्रमाणावर तेंदुपत्ता संकलन करण्यासाठी जंगल परिसरात जात आहेत. मात्र जिल्ह्यात काही ठिकाणी जंगली तसेच इतर हिंस्त्र प्राण्यांचा वावर वाढल्याने वन्य प्राणी व मानवी संघर्ष नेहमी होतांना दिसून येत आहे. असाच प्रकार आज गडचिरोली तालुक्यात दिसून आला. वाघाची दहशत पुन्हा एकदा नागरिकांना पाहायला मिळाली असल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे