Homeनागपूरभारतीय लोकशाही टिकवण्याची जबाबदारी सामान्य मतदाराची आहे

भारतीय लोकशाही टिकवण्याची जबाबदारी सामान्य मतदाराची आहे

 

भारतामध्ये ब्रिटिशांच्या आगमनाच्या वेळी भारतीय सत्ता वेगवेगळ्या गट-तट, भाषा, धर्म आणि प्रदेशांमध्ये वाटल्या गेलेले आहेत हे त्यांच्या लक्षात आले. 1818 पर्यंत भारतामध्ये जवळपास सर्वच मोठी राज्य ब्रिटिशांनी काबीज केली होती. पेशवा बाजीराव दुसरा यांच्या पराभवानंतर आणि राजा रंजीतसिंह यांच्या नंतर भारतात ब्रिटिशांना शह दिईल अशी कुठली सत्ता राहिलेली नव्हती. 1857 च्या उठावानंतर इंग्लंडचा राजा किंवा राणी यांच्या नावाने भारतीय कारभार चालेल असे ठरले.

भारतीयांना शिक्षण देण्याची गरज ब्रिटिशांना निर्माण झाली म्हणून 1835 च्या पिरॅमिड शिक्षण प्रणालीनुसार शिक्षण द्यायला सुरुवात झाली.

भारतीयांना लोकशाहीचे प्रशिक्षण देण्याचे सुरुवात 1891, 1909, 1919 आणि 1935 च्या भारतीयांना राजकीय प्रतिनिधित्व देण्यासाठी सुधारणा केलेल्या दिसून येते. 1935 च्या भारत सरकारच्या कायद्याच्या चौकटीत 1936 ला सार्वत्रिक निवडणूक घेण्यात आले. भारतीय सत्ता सोडण्यापुर्वी ब्रिटीशांनी लोकशाही मार्गाने सत्ता स्थापन करणे, राज्य घटना तयार कळणे, कायदेशीर राज्य ईत्यादी प्रशिक्षण, शिक्षण आणि लोकशाहीकरिता मानसिकता तयार करण्यात आली.

भारतीयांना शिक्षण, राजकारण, विदेश निती, अर्थव्यवस्था, बँक सर्वांमध्ये लोकशाही मार्ग कसा योग्य आहे याचे याची स्थितीची जाणीव इंग्रजांनी करून दिली. त्याच्या परिपाक म्हणून त्या वेळची राष्ट्रीय काँग्रेसने लोकशाही करणाला पाठिंबा दिलेला दिसून येतो. साम्यवादी, वांशिक राजवट, हुकुमशी आणि वांशिक भेदाभेद राजवटीचा परिपाक म्हणून 1914 ते 18 आणि 1939 ते 45 या काळात जगाने दोन महायुद्ध अनुभवली.

1947 च्या भारत स्वतंत्र्यानंतर सर्व पक्षिय राष्ट्रीय नेत्यांच्या योगदानातून आपल्याला संविधानातून लोकशाही मिळालेले आहे. आपल्या राज्यघटना कर्त्यांच्या प्रयत्नाने भारतात प्रत्येकाला राज्य आणि केंद्र सरकार निवडण्याकरता सारखाच मतदानाचा अधिकार मिळालेला आहे. यात जात, वंश, धर्म आणि लिंग आधारित असा कोणत्याही प्रकारचा भेदभाव नसून वय वर्ष 18 पूर्ण करणाऱ्या प्रत्येकाला मतदानाचा अधिकार मिळाला आहे.

भारतीय लोकशाहीमध्ये सत्तेचे केंद्र हे मतदाता असतो आणि तो राहावा म्हणून याकरता आपले कर्तव्य म्हणून मतदान करणे आवश्यक आहे. लोकशाही टिकेल, संविधान कायम राहील या दृष्टीने आपल्याला मतदान करणे आवश्यक आहे. मतदान हा आपला संविधानिक अधिकार आहे. हा अधिकार कोणत्याही संघर्ष न करता आपल्याला मिळाला कारण मतदान याकरिता संविधानामध्ये तरतुदी आहे. संविधान दिलेले अधिकार जिवंत ठेवण्यासाठी संविधानावर श्रद्धा ठेवणारी सशक्त व्यक्ती किंवा नेता निवडून देणे आवश्यक आहे.

संविधान हा सर्व जाती, धर्म आणि स्त्रियांना अधिकार देण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतोय म्हणून लोकशाहीमध्ये संविधानिक लोकशाही टिकवून ठेवण्यासाठी मतदान करणे हा एकमेव मार्ग आहे.

लेखक.
दिगंबर भाऊरावजी टुले
सहा. प्राध्यापक
तिरपुडे समाजकार्य महा. नागपूर
रा. खंडाळा खु.
मो. न. 7385763482

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!