गरजू महिलेला स्वयंरोजगारांसाठी शिवणयंत्राची  मदत.. हेल्पीग हॅन्ड व विकलांग सेवा संस्थेचा उपक्रम..

149

चंद्रपूर – नगीनाबाग येथील एका गरजू महिलेला आर्थिक अडचणीमुळे व हलाखीच्या परिस्थितीमुळे आलेल्या समस्या चीं जाणीव हेल्पीग हॅन्ड चे मुख्य संयोजक प्रदीप अडकीने ह्यांनी समजून त्यांना आज शिवभोजन केंद्र तुकूम कार्यालयात बोलावून एक नवीन शिवण यंत्र प्रदान करण्यात आले.

याप्रसंगी गरजवंत महिलेला पुष्पगुछ देऊन शिवण यंत्राचे पूजन कोमल कुबडे द्वारा करुन अडकीने ह्यांचे हस्ते त्याच्या टी मच्या उपस्थितीत नवीन शिवण यंत्र देण्यात आले. तसेच तिला स्वयंरोजगारासाठी सर्वतोपरी मदतीचे आश्वासन देण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सोनू दुपारे, राजश्री शिंदे करिष्मा तसेच देवराव कोंडेकर, पूजा प्रसाद पा न्हेरकर खुशाल ठालाल व नितीन राव यांनी सहकार्य दिले.