Homeचंद्रपूरजिवतीकोरपणा व जिवतीच्या पुढाकारातून आशा दिवस संपन्न

कोरपणा व जिवतीच्या पुढाकारातून आशा दिवस संपन्न

जिवती (ता.प्र.) : 27 मार्चला कोरपणा तसेच जिवती तालुक्यातील आशाताई व आशा गटप्रवर्तक यांच्या सन्मानार्थ तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय कोरपणा व जिवती स्थित गडचांदूर येथे आशा दिन साजरा करण्यात आला.सोबतच जागतिक क्षय रोग दीन साजरा म्हणून रॉबर्ट कोच यांचे प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले.त्यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षपदी अंबुजा सिमेंट फाउंडेशनचे उपरवाही चे विभागीय व्यवस्थापक श्री. श्रीकांत कुंभारे , प्रमुख पाहुणे वरिष्ठ प्रकल्प समन्वयक श्री जितेंद्र बैस तसेच अल्ट्राटेक सिमेंट आवळपूरचे सेक्शन हेड सीएसआर श्री प्रतीकजी वानखडे उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाच्या वेळी जिल्ह्यात प्रथम आलेल्या बीबी गावातील आशाताई विजया सुधाकर मिलमिले यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला तसेच नाविन्यपूर्व उपक्रम राबवलेल्या पिपर्डा व कोदेपूर आशाताईंचा सुद्धा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला व तदनंतर सांस्कृतिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले त्यामध्ये कोळी नृत्य ,लावणी नृत्य, गवळण ,आदिवासी नृत्य त्याचप्रमाणे तसेच गीत गायन व समाज प्रबोधन प्रबोधन नाटकाचे सुद्धा आयोजन करण्यात आले . सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका आरोग्य अधिकारी डॉ.स्वप्निल टेंभे यांनी केले तर सूत्रसंचालन आरोग्य सहाय्यक श्री विजय देवाळकर यांनी तर आभार प्रदर्शन श्री संदीपजी कांबळे यांनी केले.
सदर कार्यक्रमाला डॉ.गजेंद्र अहिरकर ,डॉ.संकेत शेंडे ,डॉ.शुभम लहांगे डॉ. अबिद शेख डॉ.ताझीन सय्यद मोबाईल मेडिकल युनिटचे डॉ. पंकज देरकर आपला दवाखाना गडचांदूर चे डॉ्.संदेश सरोदे व डॉ निखिल शेळके हे वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. सदर कार्यक्रमात श्री राजेश हिरेमठ यांनी राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमाची तर संघरत्न ठमके यांनी राष्ट्रीय कीटकजन्य निर्मूलन कार्यक्रमाची माहिती दिली. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री मोरे ,श्री संदीप कांबळे, श्री राजेश भगत अनिल पाटोरकर श्री सतीश पांढरे श्री चंद्रशेखरची पारखी ,कल्पक ठमके आरोग्य सेवक सचिन बरडे सिनियर ट्रीटमेंट सुपर व्हाजर सुभाष डोईफोडे विजू डाकरे या सगळ्यांनी सहकार्य घेतले. सदर कार्यक्रमाला कोरपणा व जिवती तालुक्यातील सर्व आशा गटप्रवर्तक तसेच आशा वर्कर उपस्थित होत्या.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!