Homeचंद्रपूरप्रा.आ.केंद्र पाटण येथे जन आरोग्य समितीचे एकदिवसीय प्रशिक्षण संपन्न

प्रा.आ.केंद्र पाटण येथे जन आरोग्य समितीचे एकदिवसीय प्रशिक्षण संपन्न

जिवती: 9 फेब्रुवारी 2023 रोजी राष्ट्रीय आरोग्य अभियान, स्टापी संस्था पुणे व प्रकृति महिला विकास केंद्र चंद्रपूर द्वारा प्रा.आ.केंद्र पाटण येथील व अंतर्गत येत असलेले उपकेंद्र नंदप्पा, हिरापूर, पुनागुडा येथील जन आरोग्य समिती सदस्यांचे एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली.

यावेळी जीवतीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. स्वप्निल टेंभे, प्रा.आ.केंद्र पाटणचे वै.अधिकारी डॉ.कविता शर्मा, प्रकल्पाचे जिल्हा समन्वयक निलेश देवतळे, जिल्हा क्षेत्र पर्यवेक्षक अक्षय देशमुख, हिरापूरचे मानसेवी अधिकारी डॉ. सचिन चिकाटे, सामुदायिक आरोग्य अधिकारी अभिनव काकडे, काजल मत्ते, तालुका समन्वयक संभाजी ढगे, मंगला घटे, आरोग्य सहाय्यक, आरोग्य सहाय्यीका, सरपंच, शाळेचे मुख्याध्यापक, ग्रा.पं. सदस्य, आशा वर्कर, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका, ग्राम आरोग्य दूत व समिती सदस्य उपस्थित होते.
सदर कार्यशाळेत डॉ.स्वप्नील टेंभे यांनी समिती बळकट करण्यासाठी सर्व समिती सदस्यांनी पुढाकार घ्यावा व आरोग्य यंत्रणा उत्कृष्ट दर्जाची करण्याचा प्रयत्न करावा असे मनोगत व्यक्त केले. तसेच डॉ.कविता शर्मा यांनी जन आरोग्य समितीमध्ये समुदायाचा सहभाग मिळवून समितीला बळकट करावे, आरोग्यावर परिणाम करणाऱ्या घटकांवर प्रतिबंधात्मक उपाय योजना व ग्रामपंचायतनी आरोग्यावर खर्च करायचा निधी आरोग्य यंत्रणेला देऊन सहकार्य करावे याबाबत मत व्यक्त केले.
प्रमुख प्रशिक्षक म्हणून जिल्हा समन्वयक निलेश देवतळे यांनी आरोग्यासाठी सामाजिक कृती कार्यक्रमाची पार्श्वभूमी सांगून, आरोग्य म्हणजे काय, आरोग्यावर परिणाम करणारे विविध घटक, आरोग्याची काळजी घेणे, समिती तयार करण्या मागची गरज, समितीचा निधी रुग्णाच्या कल्याणासाठी खर्च व्हावा, समितीचा उद्देश इत्यादी विषयावर प्रशिक्षण दिले.
तसेच जिल्हा क्षेत्र पर्यवेक्षक अक्षय देशमुख यांनी जन आरोग्य समितीची रचना, भूमिका, जबाबदाऱ्या, कार्य, निधी, बैठका व विविध आरोग्याच्या योजना इत्यादी विषयावर प्रशिक्षण दिले.
प्रशिक्षणाचे संचालन संभाजी ढगे व आभार मंगला घटे यांनी मानले. या प्रशिक्षणात मोठया संख्येने समिती सदस्यानी सहभाग घेतला.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!