Homeचंद्रपूरफक्त अर्धा मिनिट वेळ लागेल, अवश्य वाचा

फक्त अर्धा मिनिट वेळ लागेल, अवश्य वाचा

फक्त अर्धा मिनिट वेळ लागेल, अवश्य वाचा..

गरिबीला कसली आली जात पात? मी तर कधी मानली नाही. मला फक्त पोटातल्या भुकेची जात कळत होती लहानपणापासून…त्या भुकेसाठी लढत राह्यलो. कष्टत राह्यलो. लाज काज विसरून पडेल ते मिळेल ते काम करत राह्यलो.

आई दिवसरात्र कष्ट करायची तिला थोडीफार मदत होईल म्हणून मी झेपेल ती कामं करायचो, शाळा सुटली की तिच्या मागं सावलीसारखं रानात जायचो अन काम करत राहयचो… शनिवार, रविवार तर भुकेचे भान रहायचे नाही काम करताना…नुसतं काम काम.असच एका उन्हाळ्याच्या सुट्टीत सहावीची परीक्षा झाल्यावर लक्ष्मण कनिंगध्वज ह्या मित्रासोबत ताफ्यात वाजवायला जायला लागलो…

मला विशेष काही वाजवत येत नव्हतं म्हणून मी फक्त गळ्यात पेटी अड़कवुन भाता हलवायचे काम करायचो….आणि लोकांनी नाचताना वाजंतत्र्यांना सोडलेले पैसे गोळा करून पिशवित ठेवायचे काम करायचो…संबळ काय कुणी वाजवायला देत नसे..कारण तसे ते वाद्य अवघड… पण ईच्छा जबरदस्त होती…तरी ताफ्यात जात राहिलोच…

हे आमच्या भाऊबंदाना समजल्यावर त्यांनी मला त्रास द्यायला सुरुवात केली..”ह्याचं डॉकं फिरलंय, हे इतर जातीच्या लोकांत फिरातंय”.कारण वाजंत्री काम हे फक्त खालच्या जातीतल्या लोकांचे असते असे त्यांचे म्हणणे होते…. पण मी जातपात कधी मानत नव्हतो.

पण, मी हे सगळं शाळेसाठी करत आहे ह्याचं कुणाला अप्रूप वाटलं नाही की कुठल्याही भाऊबंदानी शाळेसाठी मदतीसाठी हात पुढे केला नाही….असं ताफ्यात जाऊन वाजवणं खरं तर मराठा समाजातल्या मुलांच्या दृष्टीने कमी प्रतीचं समजलं जायचं पण मला तसं कधी वाटलं नाही.

कारण कलेला कुठली आली जात? पण हेच वरच्या जातीतले समजले जाणारे लोक मात्र स्वतःच्या लग्नात मोठ्या थाटाने सनई ताशा संबळ वाजवायला कुणाला बोलावतात..??? त्यांना ते बरे चालते.अन मि तर सगळं माझ्या शाळेच्या खर्चासाठी हे सगळं करत होतो. त्याची जाणीव राहिला बाजूला अन मला आमचेच लोक चिडवत होते. हिणवत होते. मी खजील होत होतो पण खचत नव्हतो. वाजवायला जात राह्यलो. चार पैसे कमवत राह्यलो. व्यवसायाला जात लावणारे पोटाला कुठली जात असते हे मात्र सांगत नव्हते.

भयानक आहे हे सगळं……संबळ वाजवायची हौस आहे. मी शिकणार. लक्ष्मण आज तुझी आठवण खुप येते रे…एका लगीन सराईच्या हंगामात मला तू 80 रूपये मिळवून दिलेस अन् त्याच पैशातून मी सातवीला लागणाऱ्या पुस्तकांचा जुना “सट” विकत घेतला होता……

लक्ष्मणा आपण एकत्र जेवलो…एकत्र वाढलो….एकत्र शाळेत गेलो….तेव्हाहि नाही वाटले अन् आत्ताही नाही वाटत की तू “मांगाचा” आहेस अन् मी मराठयाचा….हे लिहिताना अक्षरे “अस्पष्ट” झाली रे लक्ष्या….रडवले मला तुझ्या आठवणींनी…..

फार हळव्या आठवणी आहेत आपल्या…..फयाँन्ड्री बघितल्यावर तर आपल्या आठवणींचा महापुर आला होता रे……लक्ष्या “म्हस्केवाडीला” आपण गेलतो तेव्हा तू डफडं वाजवताना कैकाडयांची “कमळी” तुला लई आवडली होती…तिचं नाव् काढून तुझं लगीन होईपर्यन्त तुला चिडवल यार मी…..सॉरी

आपली भूक अणि भुकेसाठी लागणारी भाकरी हिचा आकार गोलच होता आणि राहील…तिला कसली आली जात?
माझ्या कादंबरीच्या कित्येक पानांत तू ठाण मांडून बसला आहेस….अशा अनेक गोष्टी वाचण्यासाठी….एक भाकर तीन चुली वाचली पाहिजे

 संपर्क whatsp

9890697098

– देवा झिंजाड

#एकभाकरतीनचुली #एक_भाकर_तीन_चुली

#सगळं_उलथवून_टाकलं_पाहिजे

#सगळंउलथवूनटाकलंपाहिजे

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!