स्व. लक्ष्मीबाई महिला महाविद्यालय, आलापल्ली येथे विद्यार्थिनीकरिता “12th Fail” चित्रपटाची स्पेशल स्क्रीनिंग..

1008

गडचिरोली: 12th Fail हा सिनेमा अनुराग पाठक यांच्या ‘बारावी फेल’ या पुस्तकावर आधारलेला आहे. आयपीएस मनोज शर्मा यांच्या संघर्षाची, जिद्दीची, प्रामाणिकपणाची, चिकाटीची, स्वाभिमानाची आणि अपार कष्टाची कथा या चित्रपटात दाखवलेली आहे.

संघर्ष म्हणजे काय? या प्रश्नाचं उत्तर हव असल्यास प्रत्येकाला विशेषत: तरुणाईला हा सिनेमा बघता यावा म्हणून स्व.लक्ष्मीबाई महिला महाविद्यालय, आलापल्ली येथे विद्यार्थिनी करिता स्पेशल स्क्रीनिंग ठेवण्यात आली. हा चित्रपट बघण्यासाठी विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला व चित्रपट बघून आपणही जीवनात मोठे अधिकारी होऊ शकतो असा आशावाद विद्यार्थिनीनी बोलून दाखवला.
या कार्यक्रमाकरिता प्रा. गर्गम सर, प्रा. बारसागडे सर, प्रा. मानकर मॅडम, प्रा.पारखी मॅडम, प्रा. चापले सर, श्री मुरली कोमले (प्रयोगशाळा परिचर), ऋषीं चव्हाण, श्री. सुरज जाधव इत्यादींचे सहकार्य लाभले.