Homeचंद्रपूरनागरी ,माढेळी परिसरातील रस्ते नागरिकांसाठी ठरताहेत जीवघेणे...रस्त्याचे डांबरीकरण तत्काळ न झाल्यास तीव्र आंदोलन...

नागरी ,माढेळी परिसरातील रस्ते नागरिकांसाठी ठरताहेत जीवघेणे…रस्त्याचे डांबरीकरण तत्काळ न झाल्यास तीव्र आंदोलन करू; अभिजित कुडे

वरोरा:- तालुक्यातील संपूर्ण रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे, प्रामुख्याने नागरी माढेळी भागातील रस्त्याची दुरवस्था झाली आहे. तहसीलदार साहेब वरोरा याना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवा-युवती सेना तर्फे निवेदन देण्यात आले तात्काळ रस्त्याची कामे करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. शेगाव ते शेगाव पाटी, शेगाव ते चिकणी, महाडोळी ते महाडोळी पाटी, महाडोळी ते चिकणी, उखर्डा ते उखर्डा पाटी, नागरी – केळी-येवती -माढेळी या रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. अनेक आंदोलन झाली सतत निवेदन देवून देखील बांधकाम विभाग कुंभकर्णी झोपेत आहे, लोकाना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो आहे. शालेय विद्यार्थ्यांंना नाहक त्रास सहन करावा लागतो आहे. खराब रस्त्यामुळे बससेवा प्रभावित झाली आहे. सतत रस्त्याने अपघात घडत आहेत. अनेकांचे अपघात घडून देखील प्रशासनाला जाग आली नाही, महाडोळी रस्त्याला राज्य महामार्ग घोषित करावा असे चित्र निर्माण झाले आहे, अक्षरशः गिट्टी बाहेर आली आहे, मोठ्या मोठ्या खड्ड्यातुन कशीबशी वाट काढावी लागते आहे, कधी रुग्णालयात दाखल करण्याचे काम पडले तर या रस्त्यामुळे रुग्ण दगावले असे रस्त्याची अवस्था आहे. आंदोलन केले तरी मंजूर रस्त्याच्या कामाला श्रीगणेशा कधी होणार हा प्रश्न निर्माण झाला आहे. रस्त्याची इतकी बेकार अवस्था बघुन खरच भारत महासत्ता बनेल का असा प्रश्न पडतो आहे. संपूर्ण भागात 1 रस्ता चांगला नाही इतकी बिकट अवस्था झाली असून लोकप्रतिनिधी व बांधकाम विभाग झोपेचे सोंग करत आहे. लोकांच्या जिवाचा आटापिटा होतो रस्त्याने प्रवास करताना तरी पण इतके अपघात घडत आहेत तरी पण प्रशासनाने लक्ष केंद्रित केले नाही तर शिवसेना स्टाइल ने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना युवासेना विधानसभा युवा अधिकारी अभिजित कुडे यांनी दिला आहे. यावेळी प्रतिभा मांडवकर (युवती जिल्हा अधिकारी तथा सरपंच) पंकज पोंगळे, विजय कुडे ,अनिल येलेकर ,प्रशांत कुडे, सामाजिक कार्यकर्ते तुळशी अलाम उपस्थित होते.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!