Homeगडचिरोलीयुनिक मॉर्डन इंग्लिश मीडियम स्कूल लगाम येथे चित्रकला स्पर्धा संपन्न... विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त...

युनिक मॉर्डन इंग्लिश मीडियम स्कूल लगाम येथे चित्रकला स्पर्धा संपन्न… विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसाद…

प्रितम गग्गुरी (उपसंपादक)

अहेरी : विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या सुप्त कलागुणांना वाव मिळावे या हेतूने रिपब्लिक इंग्लिश मीडियम स्कूल अहेरी तर्फे दरवर्षी चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात येत असते. ही स्पर्धा यावर्षी प्रथमच लगाम या ठिकाणी युनिक मॉडर्न इंग्लिश मिडीयम स्कूल, लगामचे संचालक श्री स्वरूप गावडे यांच्या पुढाकाराने रविवार, दि.07/01/2024 ला स्पर्धा घेण्यात आली.

या स्पर्धेमध्ये गट अ, गट ब आणि गट क या तीन गटामध्ये चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. विद्यार्थ्यांकडून या स्पर्धाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. चित्रकला स्पर्धा संपल्यानंतर सर्व सहभागी स्पर्धकांना प्रोत्साहित करण्याकरिता प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.

स्पर्धेच्या यशस्वीतेकरिता युनिक मॉर्डन इंग्लिश मीडियम स्कूल लगाम चे संचालक स्वरूप गावडे, मंगेश नरसापुरे, संतोष अर्का तसेच सहाय्यक शिक्षिका कु.गीता सिडाम, कु.वैशाली शेडमाके आणि रिपब्लिक इंग्लिश मीडियम स्कूल अहेरी चे सहाय्यक शिक्षक श्री अशोक शेंडे यांनी सहकार्य केले.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!