गोंडपिपरी तालुक्यातील रेती घाटातून मोठ्या प्रमाणात अवैधरित्या तस्करी…

571

गोंडपिपरी:- तालुक्यातील विठ्ठलवाडा, येनबोतला, आर्वी, कुलथा, हिवरा या गावातील रेती घाटातला प्रशासनाने रेती साठी विकास कामे व शासनाने गोरगरीब घरकुल लाभार्थ्यांना स्वस्तात रेती उपलब्ध व्हावी व रेती तस्करी थांबावी या दृष्टिकोनातून जिल्हा प्रशासनाने या घाटांना स्टॉक उचलण्याची परवानगी दिली परंतु या संधीचा फायदा घेत घाट मालक रेत तस्करी करत आहेत.

विठ्ठलवाडा येनबोथला हा रेतीघाट अमजद खान यांच्या नावे असून या रेती घाटावर नदीपात्रातून पोकलँड द्वारे अवैधरित्या उत्खनन केली जात असल्याची बोंब सुरू असून नवीन तहसीलदार, नवीन उपविभागीय अधिकारी त्याचबरोबर सरकारी सुट्ट्या याचा परिपूर्ण फायदा घेत येनबोतला घाटावरून रात्रीच्या सुमारास पोकलेन मशीन नदीपात्रात उतरून रात्रीच्या सुमारास अवैध उत्खनन सुरू असून सदर उत्खनन केलेला माल हा स्टॉक वर टाकण्यात येत आहे.

येनबोतला हा घाट हा सुरुवातीपासूनच चर्चेचा विषय राहिलेला आहे. या घाटाविषयी अनेक वृत्तपत्रात बातम्या प्रकाशित झाल्या होत्या परंतु तत्कालीन तहसीलदार केडी मेश्राम व तत्कालीन उपविभागीय अधिकारी संजय कुमार ढवळे यांचे अमजद खान यांच्याशी चांगले संबंध असल्यामुळे त्यांच्यावर त्या काळात कोणत्याही प्रकारे कारवाई करण्यात आली नव्हती परंतु आता सरकारी सुट्टीचा फायदा घेत घाट मालक या घाटातून अवध्य उत्खनन करत असून शासनाला लाखो रुपयाचा चुना लावत असल्याचे दिसत आहे
काही लोकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून कुलता घाटाला टारगेट केले जात असले तरी तालुक्यातील चारही घाटातून अवद्य उत्खनन होत असताना याच घाटाला सोशल मीडियाच्या माध्यमातून टारगेट का केले जात आहे. संबंधित तीन घाटमालकाचे काही लोकांशी हितसंबंध असल्यामुळे या एकाच घाटाला टार्गेट करत असल्याची चर्चा आता गोंडपिपरी तालुक्यात रंगू लागली आहे.

स्टॉक वर चार मशीनची गरज काय?
सकाळच्या सुमारास स्टॉक वर तीन पोकलँड मशीन व एक जेसीपी असल्याचे निदर्शनात येते जर स्टॉकच उचलायचा असेल तर या चार मशीनची गरज काय असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडू लागला आहे.

रेती सोबत अवध्य मुरमाची तस्कर
नदीपात्रातून रस्ते बनवण्यासाठी मुरमाची ही तस्करी केली जात असल्याची बाब समोर आली आहे नदीपात्रातून रेती तस्करी करताना आपले वाहनाला कोणत्याही प्रकारे अडथळा येऊ नये याकरिता येती तस्करांनी नदीपात्रातून मुरूम तस्करी करून रस्ते सुद्धा बनविलेले आहे यामुळे प्रदूषणाची हानी होत आहे.