Homeचंद्रपूरजिवतीजि.प.टेकामांडवा शाळेची शैक्षणिक सहल नागपुर नगरी... बाबा आमटे यांच्या आनंदवनाला...

जि.प.टेकामांडवा शाळेची शैक्षणिक सहल नागपुर नगरी… बाबा आमटे यांच्या आनंदवनाला चिमुकल्यांची भेट,

जिवती (ता.प्र.) : तालुक्यातील जिवती पंचायत समिती अंतर्गत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा टेकामांडवा येथील शाळेची एक दिवसीय शैक्षणिक सहल नागपूर परिसरात शैक्षणिक व ऐतिहासिक ठिकाणांना भेट देऊन आली। विद्यार्थ्यांना ऐतिहासिक व शैक्षणिक ठिकाणांची माहिती व्हावी परिसरातील विविध घडामोडींबद्दल माहिती व्हावी या उद्देशाने जीवती अंतर्गत जि प टेकामांडवा या शाळेचे शैक्षणिक सहल चंद्रपूर येथील महाकाली मंदिर, भद्रावती येथील विजासन लेणी, श्रद्धेय बाबा आमटे यांची कर्मभूमी असलेल्या आनंदवन व तेथील मुक्तांगण, दिव्यांग बांधवांचा असलेला आर्केस्ट्रा,विणकाम,हातमाग तसेच नागपूर येथील रमण विज्ञान केंद्र ,महाराज बाग, झिरो माइल, दीक्षाभूमी, मॉल व मेट्रो प्रवास इत्यादी ठिकाणांना भेट देऊन सुरक्षित टेकामांडवा येथे परत आली। यावेळी या सहलीत एल एम पवार, किसन बावणे, दीपक गोतावळे ,मुखळा मलेलवार व 44 विद्यार्थी सहभागी झाले होते।ही शैक्षणिक सहल बीडिओ भागवत रेजिवाड, बी इ ओ सुनील झोडे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पालक वृंद,सहकारी रुपेश मांदाळे, उषा डोये यांचे सहकार्यामुळे यशस्वीरित्या पूर्ण केली।

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!