श्रद्धेय बाबा आमटे यांच्या ११२ वी जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप. प्रमोद नागापुरे यांचा स्तुत्य उपक्रम

599

वरोरा:  तालुक्यातील आनंदवन येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा येथे कर्मयोगी श्रद्धेय बाबा आमटे यांच्या ११२ व्या मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे सुरवात श्रद्धेय बाबा आमटे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा व्यवस्थापक समिती चे अध्यक्ष प्रेमदासजी हेमणे, आनंद निकेतन महविद्यालयाचे प्रयोगशाळा परिचर, गोंडवाना विद्यापीठ चा  महविद्यालय शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार प्राप्त प्रमोद नागापुरे यांनी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले यावेळी  मुख्याध्यापिका सौ. प्रणिता नौकरकर, शालेय मुख्यमंत्री शर्वरी नक्षिणे, शालेय उपमुख्यमंत्री सोनल गुळगंडे, व्यासपीठावर उपस्थित होते.

यावेळी प्रमोद नागापुरे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना त्यांनी आपल्या मनोगतात मला कोणीतरी मदत केली म्हणून मी कुणाला काही मदत केली पाहिजे ही भावना मनात ठेवून सामाजिक कार्य केले तर समाजाचा सर्वांगीण विकास झाला शिवाय राहणार नाही असे प्रतिपादन व्यक्त केले. तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. प्रणिता नौकरकार यांनी विद्यार्थ्यांना प्रमोद नागापुरे यांचा सामाजिक कार्याचा परिचय व्यक्त केला. व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचा समारोप विध्यार्थ्यांना चाँक्लेट वाटपात करण्यात आले. सूत्रसंचालन श्री पत्रुजी उमाटे तर आभार प्रदर्शन सौ. प्रणिता नौकरकार यांनी केले.
यावेळी शाळेतील शिक्षक संदेश चिकटे, शिक्षक मेश्राम, शिक्षीका अर्चना महाळकर विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.