वरोरा: दिनांक १८ डिसेंबर रोजी मराठी हिंदी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी महारोगी सेवा समिती आनंदवनला भेट दिली यांत संस्थेचे विश्वस्त सुधाकर कडु गुरूजी यांनी त्यांचे स्वागत केले. सर्वप्रथम श्रद्धेय बाबा व ताई. यांच्या समाधीचे दर्शन घेतले. संस्थेच्या सचिव डॉ विकासभाऊ आमटे. यांची सदिच्छा भेट घेऊन विविध विषयावर चर्चा करण्यात आले नंतर सर्व आनंदवन संस्थेच्या आढावा घेऊन स्वरानंद मध्ये अंध अपंग कलाकारांनी आर्केस्ट्रा, गीत सादर केले व सर्व अंध अपंगाचे कलाकाराचे मोहन जोशी यांनी खुप कौतुक केले. यावेळी संस्थेचे ज्येष्ठ विश्वस्त सुधाकर कडु गुरूजी, विश्वस्त सदाशिव ताजने, आनंद निकेतन महाविद्यालयाचे वरिष्ठ लिपिक कमलाकर डुकरे, संकेत कायरकर व संस्थेचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.