शेतकऱ्यांची नवरत्न अन्नत्याग आमरण उपोषणाचा मैदानात काहींची प्रकृती खालावल्याने चिंतेची बाब

521

बळीराम काळे, जिवती

जिवती (ता.प्र.) : जिवती तालुक्यातील शेतकरी कष्टकरी यांचे नवरत्न ७ डिसेंबर पासून सतत तालुका भूमिहीन शेतकरी बचाव संघर्ष समितीतर्फे सुरू असलेल्या अन्नत्याग आमरण उपोषणाचा पाचव्या दिवश असून सुद्या प्रशासनाणी उपोषण कर्त्यांची दखल घेतली नाही.आणि भूमिहीन शेतकऱ्यांचा काहीही तोडगा निघाला नाही म्हणून पाचव्या दिवशी तालुक्यातील काना कोपऱ्यातील संतप्त शेतकरी बांधव हजारोच्या संख्येने रस्त्यावर उतरले.
जिवती तालुक्यातील संपूर्ण शाळा, महाविद्यालये व बाजारपेठा बंदचा आव्हान शेतकऱ्यांनी केली आहे. आज दि.११ डिसेंबर पासून जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही. तोपर्यंत संपूर्ण जिवती तालुका बंद राहील असा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला आहे. अजूनही आंदोलनाची दखल नाही घेतली, तर हा शेतकरी बांधव पुन्हा पेटून उठणार असा जिवती तालुक्यातील जनतेचा कल दिसून येत आहे.
तालुक्यातील व्यापारी संघटना, अंगणवाडी सेविका संघटना,आशावर्क संघटना, ऑटो चालक मालक संघटना, शाळा, विद्यालय, महाविद्यालयातील विद्यार्थी, विविध सामाजिक संघटना, यांचा जाहीर पाठिंबा मिळाला असून जोपर्यंत मागण्या होणार नाहीत तोपर्यंत दिनांक १२ डिसेंबर पासून पूर्ण तालुक्याची बाजारपेठा, शाळा व निमशासकीय विद्यालय, महाविद्यालय कडकडीत बंद पाडण्याचा सर्वानुमते निर्णय तालुका वासियानी घेतला आहे.
अन्नत्याग आमरण उपोषण कर्त्यांची तब्येत खालावली असल्याने उपोषण कर्त्यानी उपोषणाचा मंडपात उपचार करण्याची विनंती केली असता संबंधित तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ टेंभे, वैद्यकीय अधिकारी, अहीरकर यांनी नियमानुसार उपोषण मंडपात उपचार करता येत नाही असे सांगून तेथून पळवाट काढली.