Homeचंद्रपूरब्रम्हपुरीशिक्षणनगरी ब्रम्हपूरीत 10 डिसेंबर पासून रंगणार महिला महाराष्ट्र केसरी कुस्तीचा रणसंग्राम ...

शिक्षणनगरी ब्रम्हपूरीत 10 डिसेंबर पासून रंगणार महिला महाराष्ट्र केसरी कुस्तीचा रणसंग्राम राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा पुढाकार राज्यभरातील 600 महिला कुस्तीपटुंचा सहभाग; लाखोंची बक्षीसे

ब्रम्हपूरी: शहराचे शिक्षण व आरोग्य विषयक सोयींसाठी अवघ्या विदर्भात नावलौकिक प्राप्त आहे. मात्र ह्याच शहरात क्रिडा स्पर्धांना देखील मोठा वाव असुन येथील अनेक खेळाडूंनी विविध क्रिडा स्पर्धांमध्ये आतापर्यंत राज्य व राष्ट्रीय स्तरावर देखील मजल मारली आहे. त्यामुळे याच पार्श्वभूमीवर यावर्षी या शहरात राज्यस्तरीय महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन राज्याचे विरोधी पक्षनेते विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या पुढाकाराने जिल्हा व तालुका कुस्तीगीर संघटनेच्या वतीने 10 ते 12 डिसेंबर या कालावधीत केले आहे.

महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या वाढदिवसानिमित्त दि. 10, 11 व 12 डिसेंबर 2023 रोजी 25 वी वरिष्ठ महिला व 6 वी सब ज्यूनियर राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा व 2 री महिला महाराष्ट्र केसरी किताब लढत स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ह्या स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतुन जवळपास 600 महिला कुस्तीगीर या स्पर्धेसाठी येणार असुन भव्यदिव्य स्वरुपात ह्या स्पर्धेचे आयोजन ब्रम्हपूरी शहरातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज क्रिडांगणात करण्यात येणार आहे.
सदर स्पर्धेचे प्रायोजक राज्याचे विरोधी पक्षनेते विजयभाऊ वडेट्टीवार हे असणार आहेत.

स्पर्धेचे उद्घाटन 10 डिसेंबर रोजी सायंकाळी सायंकाळी 6 वाजता होणार असून सदर महिला केसरी कुस्ती स्पर्धेच्या कार्यक्रमाप्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण, कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून राज्याचे विरोधी पक्ष नेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजयभाऊ वडेट्टीवार, तर प्रमुख अतिथी म्हणून पदवीधर मतदार संघ नागपूर चे आमदार अभिजीतजी वंजारी, शिक्षक मतदार संघाचे आमदार सुधाकरजी अडबाले , शहरातून निघणाऱ्या प्रमुख रॅलीचे आकर्षण सलग दोनदा महाराष्ट्र केसरीचा बहुमान मिळविणारे शिवराजजी राक्षे, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस शिवानीताई वडेट्टीवार, नगराध्यक्ष रीताताई उराडे, माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी, माजी जि. प. अध्यक्ष डॉ. सतिश वारजुरकर, नगरपरिषदेचे उपाध्यक्ष अशोकजी रामटेके, डॉ बाबासाहेब आंबेडकर एज्युकेशन सोसायटीचे सचिव प्रा. डॉ. देवेशजी कांबळे, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अध्यक्ष संतोषसिंह रावत, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाशजी फुंड प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.

@कार्यक्रमावली
10 डिसेंबर रोजी दुपारी 3 ते 5 या वेळात शहरातील मुख्य रस्त्यावरून रॅली, सायंकाळी 5 वाजता कुस्ती स्पर्धेला प्रारंभ, सायंकाळी 6 वाजता उद्घाटन समारंभ होईल.
11 डिसेंबर रोजी सकाळी 7.30 वाजता पासून कुस्तीला सुरुवात
12 डिसेंबर रोजी सकाळी 7.30 वाजता कुस्ती स्पर्धेला प्रारंभ, सायंकाळी 7 वाजता बक्षीस वितरण समारंभ संपन्न होईल.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!